श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागपंचमीचं विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. पौराणिक काळापासून नाग देवतेला पूजनीय मानले जाते. त्यामुळे श्रावणात हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेच्या प्रतिमेवर दूध अर्पण केले जाते आणि तसेच त्यांची पूजा-आराधना ही केली जाते. या वर्षी नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. असं सांगितलं जातं की, श्रावणात नाग देवतेची पूजा केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते.
नागपंचमीचे महत्त्व –
नागपंचमीचा दिवस कालसर्प योग आणि ग्रहपिडा यापासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, असे म्हणतात की नाग पंचमीला नागाची पूजा केल्याने सर्व दोषातून मुक्ती होते. नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील फायद्याचे मानले जाते. राहु-केतूची पीडा सुरू असल्यास त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस शुभ मानला जातो. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी घराच्या दोन्ही बाजूला शेणाने नागाचे चित्र काढले जायचे. यामुळे सर्पदंशाची भिती कमी होते असे समजले जात असे.
नागाची आठ रुपे –
नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख या नागांच्या आठ रूपांची पूजा केली जाते.
नाग पंचमी तिथी –
पंचमी तिथी 29 जुलै रोजी सकाळी 5.24 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12.46 वाजता संपेल.
पुजाविधी –
हेही पाहा –