वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यात मालामाल, टॉप 11 खेळांडूमध्ये अशा छापल्या नोटा
GH News July 16, 2025 06:11 PM

इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशी याची केवळ बॅटच तळपली असे नाही तर त्याचे नशीब सुद्धा चमकले आहे. त्याने धावांसोबत पैशांचा पाऊस सुद्धा पाडला. त्याने या दौऱ्यात चांगली कमाई केली. वैभव हा टॉप 11 खेळाडूंमध्ये, प्लेईंग एलेवनमध्ये खेळतोय. त्यामुळे त्याची कमाई पण चांगली होत आहे. आयपीएलप्रमाणेच त्याची बॅट या दौऱ्यात तळपली आहे. लवकरच तो या दौऱ्यात एखादा खास रेकॉर्ड नावावर करतो काय, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. इतक्या कमी वयात पदार्पणातच दणकेबाज फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूची इंग्लंडमध्ये सुद्धा चर्चा आहे.

किती होते कमाई?

BCCI कडून भारताच्या 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंना सामना खेळण्यासाठी 20 हजार रुपये मिळतात. इतकी रक्कम त्या खेळाडूंना रोज मिळते. जे प्लेईंग इलेव्हनमध्ये सहभागी होतात. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यात जवळपास प्रत्येक सामन्यात हजेरी लावलीच नाही तर तो सामना गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रत्येक सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. भारताच्या अंडर 19 टीममध्ये इंग्लंड दौऱ्यात पहिल्या 5 एकदिवसीय सामन्यात आणि नंतर 2 कसोटीतील पहिला सामना त्याने खेळला आहे.

वैभव सूर्यवंशीने छापल्या नोटा

वैभव सूर्यवंशीने किती कमाई केली, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे. तर एकदिवसीय सामना खेळल्याने त्याला प्रत्येक सामन्यात 20 हजार रुपये मिळाले. म्हणजे 5 वनडे सामन्यात त्याची एकूण कमाई एक लाख रुपये इतकी झाली. तर कसोटीत भारतीय संघाने चार दिवसीय सामना खेळाला. त्या चार दिवसांचे तिला 80 हजार रुपये मिळाले. म्हणजे आतापर्यंत या इंग्लंड दौऱ्यात त्याने 1,80,000 रुपयांची कमाई केली. ही कमाई केवळ सामन्यांची आहे. त्यात त्यांची इतर कमाई गृहित धरण्यात आलेली नाही.

इंग्लंड दौऱ्यावर 19 वर्षाच्या खालील संघाचा अजून दुसरा चार दिवशीय सामना खेळणे अजून बाकी आहे. वैभव टीम इंडियाच्या 11 खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे या चार दिवसांत तो मैदानावर असेल. त्याची कमाई 80 हजारांच्या घरात होईल. त्यामुळे इंग्लंडच्या दौऱ्यात वैभवची अजून कमाई होणे बाकी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.