-भाईंचा प्लास्टिकबंदीचा निर्णय अभूतपूर्व ऐतिहासिक
esakal July 27, 2025 11:45 AM

१७ (रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख २)
(टिप ः रामदास कदम वाढदिवस पुरवणी)


rat२६p२१.jpg, rat२६p२२.jpg, rat२६p२३.jpg -
P२५N८००९६, २५N८००९७, २५N८००९८
कोकणची बुलंद तोफ शिवसेना नेते रामदास कदम.
rat२६p२४.jpg-
P२५N८००९९
मुंबई येथील पालखी निवासस्थानी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना शिवसेने नेते रामदास कदम, शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्य मान्यवर.

कोकण आणि शिवसेना हे जसं एक जुनं नातं आहे, तसंच रामदासभाई आणि कोकण हे देखील एक अतूट असं नातं आहे. विधानसभेतील कोकणचा बुलंद आवाज म्हणून रामदासभाईंची वेगळी ओळख कुणालाच सांगायला नको. त्यामुळे कोकणातील विविध विषय अभ्यासपूर्ण विधानसभेत मांडणारे असे हे अभ्यासपूर्ण नेतृत्व आज वयाच्या ७३व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देताना त्यांच्या सुहृदयने पर्यावरणक्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा येथे घेतला आहे....

rat२६p५.jpg-
२५N८००५८
- दिनेश शर्मा, उद्योजक

---
प्लास्टिकबंदीचा निर्णय अभूतपूर्व ऐतिहासिक
कोकण आणि शिवसेना हे समीकरण वर्षानुवर्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोकणातील सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते राज्याच्या उच्चपदापर्यंत पोहोचले; मात्र शिवसेनेचे खरे डॅशिंग नेतृत्व व कोकणचा वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ स्वकर्तृत्वावर राजकीय क्षेत्रात उत्तुंग अशी झेप घेणाऱ्या रामदासभाई कदम यांनी १९६६ मध्ये कांदिवली पूर्व, हनुमान नगर येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदाची सुत्रे हाती घेत राजकीय बाळकडू पिण्यास प्रारंभ करणाऱ्या भाईंनी शिवसेनेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याचे वृत्त अंगीकारले. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या रामदासभाईंना १९९० मध्ये विधानसभेची संधी मिळाली. त्यानंतर विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विजयाची माळ रोवत त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. शाखाप्रमुख झाल्यापासून ते आजवरच्या मंत्रिपदाच्या यशस्वी वाटचालीत त्यांच्यातील खऱ्या शिवसैनिकाची साक्ष नेहमीच दिसून येते.
महाराष्ट्रातील पर्यावरणाचा ढासळणारा समतोल टिकवण्याबरोबरच जनतेला सुसह्य जीवन जगता यावे यासाठी भाईंनी पर्यावरणमंत्री असताना प्रदूषणमुक्त स्वच्छ महाराष्ट्र करण्याचे शिवधनुष्य उचलले. संपूर्ण राज्यात प्लास्टिकबंदीच्या घेतलेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत आजही केले जात आहे. पर्यावरणमंत्री असलेल्या भाईंनी या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्लास्टिकचे दुष्परिणाम व बंदीचे महत्त्व यावर चर्चा केली. पर्यावरण विभागाचे सचिव सतीश गवई, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत राज्यातील सहाही महसूल विभागात सतत बैठका घेऊन प्लास्टिक बंदीसंदर्भात सविस्तर चर्चा करून जनजागृती करण्याची व तंतोतंत काटेकोरपणे अंमलबजावणी कशी करता येईल, यावर भाईंनी सतत पाठपुरावा करून प्लास्टिकबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला.
चौकट
प्लास्टिकबंदीबाबत पावले
६ सप्टेंबर २०१७ रोजी पर्यावरणमंत्री असलेल्या रामदासभाईंनी प्लास्टिक व थर्माकोल वापराच्या बंदीबाबत सूतोवाच केले होते. या ऐतिहासिक निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केली. २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत मिठीनदीत साचलेला गाळ, त्यात प्लास्टिकचा महापूर या नैसर्गिक आपत्तीचे रूपांतर मनुष्यनिर्मित आपत्तीत झाले होते. ऑगस्ट २०१७ मध्येही अतिवृष्टीत महापुराने अवघी मुंबई प्लास्टिकने वेढली होती. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदीबाबत प्रकर्षाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली. या वेळी पर्यावरणमंत्री म्हणून रामदासभाईंनी स्वतः पुढाकार घेऊन प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा पाठपुरावा करताना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.