बातुमी (जॉर्जिया) : आंध्र प्रदेशची ३८ वर्षीय अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी व महाराष्ट्राची १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख यांच्यामधील महिला बुद्धिबळ विश्वकरंडकाचा अंतिम फेरीचा दुसरा टप्पाही बरोबरीत (ड्रॉ) राहिला. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांनंतर हंपी व दिव्या यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून, आता विश्वविजेतेपदाचा निकाल उद्या (ता. २८) होणार असलेल्या टायब्रेकमध्ये लागणार आहे.
कोनेरू हंपी - दिव्या देशमुख या दोन भारतीय खेळाडूंमध्ये विश्वकरंडकाचा अंतिम सामना रंगत आहे. शनिवारी या अंतिम फेरीला सुरुवात झाली. अंतिम फेरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरी झाली. अर्थातच पहिला टप्प्यात ड्रॉवर समाधान मानावे लागले. दोन्ही खेळाडूंनी या टप्प्यामध्ये वर्चस्वाची संधी गमावली होती. पहिल्या टप्प्यात दिव्या पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळली आणि हंपी काळ्या मोहऱ्यांसह लढली.
कोनेरू हंपी व दिव्या देशमुख यांच्यामधील अंतिम फेरीचा दुसरा टप्पा रविवारी पार पडला. या टप्पामध्ये हंपी पांढऱ्या मोहऱ्यांसह मॅटवर उतरली. दिव्याला काळ्या मोहऱ्यांसह खेळावे लागले. हंपी या टप्प्यामध्ये अनुभवाच्या जोरावर पुढे जाईल असे वाटत होते. मात्र पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत असूनही तिला या संधीचा फायदा घेता आला नाही. काही वेळा पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना जास्त जोखीम पत्करता येत नाही. त्यामुळे कदाचीत हंपीने जोखीम पत्करली नसावी.
टायब्रेकमध्ये कस लागणारकोनेरू हंपी व दिव्या देशमुख या दोन्ही खेळाडूंचा उद्या होत असलेल्या टायब्रेकमध्ये कस लागणार आहे. रॅपिड गेम्स व ब्लिट्झ या प्रकारांमध्ये दोन्ही खेळाडूंना लढावे लागणार आहे. हंपीकडे टायब्रेकमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तिचे पारडे जड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दिव्याचे प्रयत्नमहाराष्ट्राची स्टार खेळाडू दिव्या देशमुख हिने काळ्या मोहऱ्यांसह खेळतानाही कोनेरू हंपी हिच्यावर वर्चस्व गाजवण्याचे प्रयत्न केले. अर्थात तिला यामध्ये यश मिळाले नाही. त्यानंतर तिने दुसरा टप्पा ड्रॉ होईल याकडे पावले उचलली. मात्र निर्णायक क्षणी तिने केलेल्या चाली सुंदर होत्या.
PM Narendra Modi: पैठणी विणत्या हातांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव! पैठणच्या कविता ढवळेंच्या कार्याचा ‘मन की बातमध्ये उल्लेख संधीच्या प्रतीक्षेतहंपी व दिव्या या दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडू चूक करतोय का, याकडे विशेष लक्ष देत होत्या. मात्र ही संधीची प्रतीक्षा अखेरपर्यंत कायम राहिली. दोघींकडूनही सावध पावले उचलली जात होती. मात्र दोन्ही खेळाडू चूक करीत नाहीत, हे बघितल्यानंतर अखेर ३४ व्या चालीनंतर हा टप्पा ड्रॉ राखण्यात आला.