एखाद्या कामासाठी नागरिक सरकारी कार्यालयातून प्रमाणपत्र घेतात. अनेकदा त्यात प्रशासकीय अधिकारी, लिपिक यांच्याकडून झालेल्या चुकांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर कधी कधी आश्चर्यचकित करणाऱ्या चुकाही होता. वीज बिलाचे आकडे अनेकदा लोकांना धक्का देणारेच असतात. अशातच आता देशातील एका व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला व्हायरल होत आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. संबंधित व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न केवळ तीन रुपये असं दाखवलं गेलंय. या प्रमाणपत्रावर तहसिलदारांची सहीसुद्धा आहे. मध्य प्रदेशातल्या एका नागरिकाचं हे प्रमाणपत्र आहे.
उत्पन्नाच्या दाखल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यानंतर ती व्यक्ती भारतातली सर्वात गरीब व्यक्ती असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. प्रमाणपत्रावर वार्षिक उत्पन्न ३ रुपये असं स्पष्ट लिहिण्यात आलं आहे. अंकात आणि अक्षरात अशा दोन्हीमध्ये उत्पन्न ३ रुपये असंच लिहिलं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लिपिकांकडून चूक झाली तरी लिहिताना लक्षात कसं आलं नाही, तहसिलदारांना स्वाक्षरी करताना ही बाब निदर्शनास आली नाही का? वार्षिक ३ रुपये उत्पन्न असू शकतं का अशी शंका कशी आली नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
प्लीज वाचवा! बँकेतून ९ लाख काढताच तरुणाचं कारमधून अपहरण, २ किमीवर फेकून दिलं; मदतीसाठी ओरडताना बघ्यांनी VIDEO काढलामध्य प्रदेशात सतना जिल्ह्यातल्या कोठी तालुक्यात नायगाव इथल्या रामस्वरुप श्याम लाल यांचा हा उत्पन्नाचा दाखला आहे. कोठी तालुक्याचे तहसिलदार सौरभ द्विवेदी यांनी हा दाखला दिला आहे. यात रामस्वरुप यांचं सर्व प्रकारचं वार्षिक उत्पन्न के फक्त तीन रुपये असल्याचं म्हटलंय. अर्जदाराने दाखल केलेल्या अर्जाच्या आधारे हा उत्पन्नाचा दाखला दिला असल्याचं त्यात म्हटलं आहे.
तहसिलदारांकडून या उत्पन्नाच्या दाखल्यावर खुलासा करण्यात आला आहे. सौरभ द्विवेदी यांनी म्हटलं ही, उत्पन्नाच्या दाखळ्यासंदर्भात लिपिकाने ही चूक केली होती. ही चूक दुरुस्त करण्यात आलीय. तसंच नवा उत्पन्नाचा दाखला देण्यात आला आहे. हा दाखला २२ जुलै २०२५ रोजी देण्यात आला होता.