25 IPS अधिकाऱ्यांची फौज अमिर खानच्या दारात, माजली खळबळ, अभिनेत्याच्या टीमकडून धक्कादायक वक्तव्य
Tv9 Marathi July 28, 2025 10:45 PM

Aamir Khan: अभिनेता आमिर खान याच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याच्या वांद्र येथील घरातील पोलीस बाहेर पडताना दिसले. 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते अनेक अंदाज लावत आहेत. अधिकाऱ्यांची एक टीम आमिरला भेटण्यासाठी आली होती अशी चर्चा आहे, पण यावरअद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेले नाही.

आमिर खान याच्या घराबाहेरचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. अशात आमिर खान याच्या टीमने दिलेल्या उत्तराची देखील चर्चा सुरु आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिर खान याच्या टीमला कारण विचारण्यात आलं.

यावर उत्तर देखील आमिरची टीम म्हणाली, ‘आयपीएस अधिकाऱ्यांची टीम वांद्रे येथील घरी का गेलेली याचं कारण आम्हाला देखील माहिती नाही… आम्ही याबद्दल आमिरसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर आता गौरी स्प्रेट हिला डेट करत आहे. अशात वयाच्या 60 व्या वर्षी आमिर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का? असा प्रश्न देखील चाहते विचारत आहे.

अनेकदा आमिर खान आणि गौरी स्प्रेट यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. सांगायचं झालं तर, स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आमिर याने गौरी स्प्रेट हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली. खान कुटुंबियांसोबत गौरी स्प्रेट हिचे चांगले संबंध आहेत.

आमिर खान याचा आगामी सिनेमा

आमिर खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता राजकुमार हिरानी यांच्या आगामी सिनेमात असणार आहे. ज्यामध्ये आमिर खान भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारणार आहे.

नुकताच अभिनेत्याचा ‘सितारे जमीन पर’ सिनेमा प्रदर्शित झालेला. सिनेमा आमिर खान याच्यासोबत अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 165 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. आता चाहते आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.