कास : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम येरणे गावातील संदेश भीमराव घाडगे याने यूजीसी नेट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करत आपले प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याने एक यशस्वी पाऊल टाकले आहे.
Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँकआई- वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताचीच. वडील शेती करत गावचे कोतवालीचे काम करत असताना अशा परिस्थितीत येरणे गावात सातवीपर्यंत शिक्षण घेत पुढील शिक्षणासाठी मेढा (ता. जावळी) येथे भाड्याने खोली घेऊन माध्यमिक शिक्षण सुरू केले. उच्च शिक्षणासाठी सातारा येथील शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे इतिहास विषयात एमए करत असतानाच प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी यूजीसी नेट या परीक्षेची तयारी सुरू केली; पण दुर्दैवाने संदेशला अचानक अर्धांगवायूसारख्या आजाराने ग्रासले.
घरची परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी समाजाकडे मदत मागण्याची वेळ आली. यातच कोयना भागातील समाजसेवक संतोष मालुसरे यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदत झाली, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही सहकार्य मिळाले. सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे दोन वर्षे उपचार घेतल्यानंतर संदेश कसाबसा या आजारातून बरा होऊ लागला.
आपले ध्येय असणारी यूजीसी नेटची परीक्षा पास व्हायचीच, ही जिद्द असलेल्या संदेशने आजारावर मात करत पुन्हा परीक्षेची तयारी सुरू केली. नुकतेच या परीक्षेत त्याने यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल कौतुक होतच आहे; पण शारीरिक व्याधींवर मात करत पुन्हा यशस्वीपणे उभे राहण्याचा ‘संदेश’ आपल्या नावाप्रमाणेच तरुण पिढीला देण्याचे काम संदेशने केले.
वेळेचे नियोजनहल्ली मुलाला कळायला लागले, की हातात मोबाईल लागतोय. मात्र, संदेशने आतापर्यंत स्वतःसाठी स्मार्टफोन सोडा; पण छोटा मोबाईलही घेतला नाही. त्यामुळे मोबाईल हाताळण्यात जाणारा अनावश्यक वेळ वाचला. त्यातूनच अभ्यासाच्या वेळेचे योग्य नियोजन करून आपले स्वप्न साकार केले असल्याचेही संदेश घाडगे याने सांगितले.
Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालंसमाजाने केलेल्या मदतीमुळे आज उभा आहे. संघर्ष, जिद्द, चिकाटी असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. प्रयत्न मनापासून करा, यश नक्कीच मिळेल.
- संदेश घाडगे