बंद झालं ना उल्लू ॲप, आता काय करणार? 'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेत्रीला नेटकऱ्यांचे घाणेरडे प्रश्न; उत्तर देत म्हणाली- ज्यांना...
esakal July 29, 2025 08:45 AM

नुकतीच सरकारने अल्ट, उल्लू, बिग शॉट्स यांसारख्या बोल्ड आणि अश्लील कंटेन्ट दाखवणाऱ्या ॲपवर बंदी घातली. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि नागरिकांकडून या विविध अॅपविरोधात सरकारकडं तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्व ॲपना अश्लील व बीभत्स दृश्ये प्रसारित करू नये, असे बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने आता अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हे ॲप बंद केले. मात्र त्यानंतर एका मराठी अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

काय आहे कारण?

ही अभिनेत्री आहे सारिका साळुंखे. सारिकाने 'शाळा', 'पिंकीचा विजय असो'अशा काही मालिकांमध्ये काम केलंय. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. पण ती उल्लू ॲपवरील बोल्ड कन्टेन्टमुळे चर्चेत आली. तिने काही बोल्ड सीरिजमध्ये काम केलंय. आता ॲपवर बंदी आल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. त्यावर सारिकाने उत्तरही दिलंय.

View this post on Instagram

A post shared by sarika salunkhe (@queen_sarah_official01)

काय म्हणाली सारिका?

सारिका म्हणाली, 'गेल्या ४-५ दिवसांपासून, अनेक लोक कमेंट करत आहेत आणि मला विचारत आहेत की आता उल्लूवर बंदी घातली आहे तर तु पुढे काय करणार? आता तुझं काय होणार? माझी मराठी मालिका बंद झाल्यानंतरही मला इतक्या कमेंट्स आलेल्या नाहीत. तेवढ्या कंमेट्स आत्ता येत आहेत, असं सारिकानं म्हटलंय.असो...ज्याची त्याची मानसिकता असते, तो शो देखील तसेच पाहतो. तुमच्या माहितीसाठी, सांगते की मी आजपर्यंत माझ्या कोणत्याही सीरिजची जाहिरात केली नसली तरी, मला तिथं टॉप अभिनेत्रीचा दर्जा देण्यात आला.'

ती म्हणाली, 'मी उल्लू अॅप प्लॅटफॉर्मची कायम आभारी आहे, जे मला ३ वर्षात मिळालं नाही, ते नाव, प्रसिद्धी, पैसा, काम, रिअॅलिटी शो, उल्लूनं या एका वर्षात दिलं.या प्रसिद्धीचा योग्य वापर करणं ही माझी जबाबदारी आहे. आणखी एक गोष्ट सांगितली जाते की जर एक मार्ग बंद झाला तर १०० मार्ग उघडतात. असो, ज्यांना समज आहे त्यांच्यासाठी एक इशारा पुरेसा आहे.'

'बाजीराव मस्तानी'साठी 'या' मराठी अभिनेत्यानेही दिलेली ऑडिशन; मात्र वैभव तत्ववादीला मिळाली भूमिका, म्हणाला, रिजेक्शनपेक्षा...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.