त्र्यंबकेश्वर ते कपालेश्वर : नाशिकच्या शिवमंदिरांचा गौरवशाली इतिहास
esakal July 30, 2025 08:45 AM
Nashik Shiva temples प्रचलीत शिवमंदिरे

नाशिकमधील प्रसिद्ध आणि प्रचलीत शिवमंदिरे कोणती व त्यांचा इतिहास काय आहे जाणून घ्या.

Nashik Shiva temples त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

हे मंदिर नाशिकपासून सुमारे २८ किमी अंतरावर आहे. हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचे प्रतीक असलेली तीन लहान लिंगे आहेत. नानासाहेब पेशवे यांनी १८ व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराची सध्याची रचना हेमाडपंती शैलीत आहे. येथे कुशावर्त कुंड आहे, जिथे गोदावरी नदीचा उगम मानला जातो.

Nashik Shiva temples कपालेश्वर मंदिर

हे मंदिर नाशिकच्या पंचवटी परिसरात, गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. हे एक अद्वितीय शिव मंदिर आहे कारण येथे शिवासमोर नंदी नाही. पौराणिक कथेनुसार, शिवाने ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी नंदीने दाखवलेल्या मार्गावर गोदावरीत स्नान केले, त्यामुळे नंदीला गुरूचा दर्जा मिळाला आणि तो शिवासमोर बसलेला नाही. हे मंदिर ५०० वर्षांहून अधिक जुने मानले जाते.

Nashik Shiva temples सोमेश्वर मंदिर

हे गंगापूर रोडवर, नाशिक शहरापासून काही अंतरावर आहे. हे एक शांत आणि सुंदर परिसरातील मंदिर आहे. येथे भगवान शिव आणि नंदी यांची मोठी मूर्ती आहे. गोदावरी नदीच्या काठी असल्याने हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Nashik Shiva temples नारोशंकर मंदिर (घंटा मंदिर)

हे मंदिर पंचवटी, रामकुंड घाटाजवळ आहे. १७३४ मध्ये नारोशंकर राजबहादूर यांनी हे मंदिर बांधले. या मंदिरातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य घंटा, जी पोर्तुगीजांकडून जिंकून आणली गेली होती असे मानले जाते. ही घंटा सुमारे ६०० किलो वजनाची आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी असून, त्याच्या स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे.

Nashik Shiva temples तिळभांडेश्वर मंदिर

नाशिक शहरातील रविवार कारंजा परिसरात हे मंदिर आहे. हे एक प्राचीन शिव मंदिर आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे विशेष पूजा आणि गर्दी असते.

Nashik Shiva temples सिद्धेश्वर मंदिर

नाशिक शहरात, जुने नाशिक परिसरात हे मंदिर आहे. हे एक स्थानिक पातळीवर महत्त्वाचे शिव मंदिर मानसे जाते. अनेक वर्षांपासून हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

Nashik Shiva temples गोदावरी जवळचे शिव मंदिरे

रामकुंड, पंचवटी परिसरात हे मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या मंदिराच्या परिसरात अनेक लहान शिव मंदिरे आहेत, जिथे भाविक गोदावरी स्नानानंतर दर्शन घेतात. हे मंदिर सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित आहे.

Nashik Shiva temples शीवमंदिरे

या सारखी अनेक शीवमंदिरे नाशिकमध्ये प्रचलीत आहेत. श्रावनात तुम्ही या मंदिरांना भेट देवू शकतात.

Nag Devta Temples in India एकदा तरी भेट दिलीच पाहिजे अशी भारतातील नाग देवतेची ७ मंदिरं येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.