आदर्श पुरस्काराने सन्मान
esakal August 07, 2025 02:45 AM

rat५p९.jpg -
२५N८२२४९
राजापूर ः नायब तहसीलदार सायली गुरव यांचा गौरव करताना उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन. सोबत तहसीलदार विकास गंबरे आणि मान्यवर उपस्थित होते.

मंगेश परांजपे, माया गंबरेंचा
आदर्श पुरस्काराने सन्मान
राजापूर, ता. ६ ः राजापूर तहसीलदार कार्यालयात महसूल दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच राजापूर तालुका आदर्श महसूल कर्मचारी पुरस्कार साहाय्यक महसूल अधिकारी मंगेश परांजपे यांना आणि ग्राममहसूल अधिकारी माया गंबरे यांना आदर्श ग्राममहसूल अधिकारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महसूल दिनाचे औचित्य साधून २०२४-२५ या महसुली वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसीलदार विकास गंबरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यामध्ये नायब तहसीलदार सायली गुरव, निवडणूक नायब तहसीलदार मृणालिनी शेळके, साहाय्यक महसूल अधिकारी बाजीराव पाटील, मंडल अधिकारी मच्छिंद्र जाधव, महसूल साहाय्यक विशाल जाधव, ग्राममहसूल अधिकारी शंकर चौगुले, वाहनचालक दीपक गंवडी, शिपाई अनंत मोरे, महसूल सेवक सत्यजित जाधव, नीलेश माळी यांचा समावेश आहे.
----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.