मियां भाईचा Swag! मोहम्मद सिराजकडे ५.६८ कोटींच्या घड्याळांचे कलेक्शन, क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीचं पहिलं घड्याळ २१,९९५ रुपयांचं
esakal August 08, 2025 04:45 PM
  • इंग्लंड दौऱ्यात सर्वाधिक २३ विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज ठरला.

  • दी ओव्हल कसोटीत ९ विकेट्स घेऊन सामनावीर बनलेल्या सिराजने मालिका २-२ अशी वाचवली.

  • सिराज ICC कसोटी क्रमवारीत १५ व्या स्थानावर झेपावला.

7 Expensive watches Mohammed Siraj owns : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंड दौरा गाजवून स्वतःचा दर्जा उंचावला आहे. इंग्लंड दौऱ्यातील सर्व पाच कसोटी खेळणारा तो भारताचा एकमेव जलदगती गोलंदाज आहे आणि त्याने सर्वाधिक १८३.५ षटकं या मालिकेत फेकली. शिवाय सर्वाधिक २३ विकेट्सही त्याने घेतल्या आणि त्याच्याव्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला २० विकेट्सही घेता आलेल्या नाहीत. लॉर्ड्सवरील पराभवाचे दुःख उराशी बाळगून तो दी ओव्हलवर उतरला अन् अशक्य विजय शक्य करून दाखवला. इंग्लंड दौरा गाजवल्यानंतर मायदेशात सिराजचे जंगी स्वागत झाले.

इंग्लंडमधील कामगिरीमुळे त्याने जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमावरीत मोठी झेप घेतली आणि १५ व्या स्थानावर आला आहे. सिराज मैदानावरील त्याच्या कामगिरीने चर्चेत असला तरी तो त्याच्या मैदानाबाहेरील स्टायलिस्ट राहणीमानानेही ट्रेंडमध्ये असतो. गरीबीतून वर आलेल्या सिराजचा आलिशान लाईफस्टाईल हा हक्कच आहे.

'पूरा खोल दिये पाशा'! ओवैसींचं कौतुक अन् Mohammed Siraj ने एका वाक्यात दिला रिप्लाय; म्हणाला... सहा कोटी किमतीच्या घड्याळांचे कलेक्शन आहे.
  • Rolex Daytona Rainbow – अंदाजे किंमत: ३ ते ४ कोटी ( हे घड्याळ रेनबो डायल आणि प्रेशस स्टोन्ससाठी प्रसिद्ध असून, सेलिब्रिटीजमध्ये खूप लोकप्रिय आहे.)

  • Rolex Daytona Platinum – किंमत: १.०१ कोटी ( क्लासिक प्लॅटिनम डिझाइन आणि स्टेटस सिंबॉल म्हणून ओळखले जाते.)

  • Rolex GMT Master – किंमत: १०.४० लाख ( ट्रॅव्हलरसाठी डिझाइन केलेले हे घड्याळ स्टाईल आणि युटिलिटीचं परफेक्ट मिश्रण आहे.)

  • Hublot Big Bang Rose Gold – किंमत: २९.४९ लाख ( हे घड्याळ त्याच्या अनोख्या डिझाइन आणि गोल्ड फिनिशसाठी प्रसिद्ध आहे.)

  • Audemars Piguet Royal Oak Offshore Chronograph – किंमत: २७.४७ लाख ( घड्याळांच्या दुनियेत प्रतिष्ठित ब्रँड – अत्युच्च दर्जाचा स्पोर्टी लुक.)

  • Tag Heuer Aquaracer Quartz Stainless Steel – किंमत: १.३१ लाख ( जलक्रीडेसाठी उपयुक्त आणि स्टायलिश पर्याय )

  • Casio Watch (करिअरच्या सुरुवातीचा खरेदी) – किंमत: २१,९९५ ( मोहम्मद सिराजचं पहिले घड्याळ – त्याच्या प्रवासाची सुरुवात.)

पाकिस्तानी खेळाडूचं डोकं फिरलंय! भारतीय गोलंदाजांवर Ball Tampering चा आरोप केला, इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे शेजाऱ्यांना पोटदुखी

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या कसोटीत ९ विकेट्स घेणाऱ्या सिराजला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. सामन्यानंतर सिराज म्हणाला, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सामना होता. पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत आम्ही ज्या प्रकारे लढा दिला, तो अविश्वसनीय होता. आम्ही हा सामना जिंकू, हा विश्वास एकमेकांमध्ये होता. माझ्या नशीबात काहीतरी खास लिहिले होते आणि त्यामुळेच मला शेवटची विकेट घेण्याची संधी मिळाली.

दरम्यान, त्याच्या जोशामुळे आणि आक्रमकतेमुळे इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याला एक टोपन नावही देण्यात आले आहे. याबाबत इंग्लंडचे माजी खेळाडू नासिर हुसेन आणि स्टूअर्ट ब्रॉड यांनी खुलासा केला आहे. त्यांनी दोघांनीही सांगितले आहे की सिराजला इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये 'मिस्टर अँग्री' म्हणून टोपन नावाने बोलले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.