Police Officers Promotion: राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश; वाचा संपूर्ण लिस्ट
Saam TV August 08, 2025 04:45 PM
  • राज्यातील १५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती.

  • सहाय्यक पोलीस आयुक्त, उपअधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश.

  • गृहमंत्रालयाकडून पदोन्नतीचे अधिकृत आदेश जारी.

  • IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर पोलीस खात्यात मोठा फेरबदल.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता राज्यातील १५० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आलीय. सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी पदासाठी असलेल्या पदावर पदोन्नती करण्यात आलीय. गृहमंत्रालयानेत्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Navneet Rana Threat: भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर शहरातील अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीय. तसेच राज्यातील ३५ सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या सुद्धा झाल्या आहेत. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न तरतुदींनुसार पदोन्नती करण्यात आलीय.

हा शासन आदेश आस्थापना मांडळ क्र. 1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22न मध्ये नमूद सर्वोच्च सक्षम प्राधिकारी याांच्या मान्यतेने जारी करण्यात आले आहेत. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.त्याचा सांकेतांक 202508072204462829 असा आहे. तसेच हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलाय.

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला राज्यात ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मंगळवारी ५ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. मुंबई येथील विकास आयुक्त (असंघटित कामगार) पदावर असलेले तुकाराम मुंढे यांची बदली ही दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आलीये. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांची बदली आता राज्य कर विभागाच्या विशेष आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.