टेकऑफच्या आधी विमानात वाजू लागला अलार्म; टॉयलेटची अवस्था पाहून एअर होस्टेसला धक्काच बसला
GH News August 08, 2025 05:10 PM

सध्या विमानप्रवास म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. आजकाल तर विमानात प्रवास करताना अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. तसेच साप निघण्यापासून ते झुरळ निघण्यापर्यंतचे बरेच विचित्र प्रकार घडताना दिसत आहेत. असाच एक प्रकरा घडला एक विमानात. रायनएअरच्या फ्लाइटमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. जेव्हा एअर होस्टेटसला हे दिसलं तेव्हा ती सुद्धा थक्क झाली.

प्रवासी काही वेळासाठी चांगलेच घाबरले होते

हे विमान स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विमानतळावरून स्पेनमधील एलिकांटेला जात होते. उड्डाण करण्यापूर्वी विमानाच्या बाथरूममधील स्मोक डिटेक्टर अलार्म अचानक वाजू लागला. त्यामुळे सगळेच प्रवासी काही वेळासाठी चांगलेच घाबरले होते. त्यामुळे एअर होस्टेसने बाथरूमकडे जात तपासणी केली. तिने जेव्हा बाथरुम उघडलं तेव्हा बाथरूममध्ये एका 21 वर्षीय प्रवासी धूम्रपान करत होता. एडिनबर्ग विमानतळावरून एलिकांटेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये स्मोक डिटेक्टर वाजताच एअर होस्टेसला तो ई-सिगारेट पेटवताना आढळला. त्यावर त्या मुलाने देखील काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तसेच त्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ज्यामुळे फ्लाइटला देखील विलंब झाला.

तो माणूस विमानाच्या बाथरूममध्ये…

जेव्हा एअर होस्टेस बाथरूममध्ये पोहोचली तेव्हा तिला एक माणूस ई-सिगारेट पेटवत असल्याचे दिसले जणू बाथरूम स्मोकिंग रूम आहे. एअर होस्टेसने पायलटला याबद्दल माहिती दिली. यानंतर सहा पोलिस अधिकारी विमानात चढले आणि आरोपीला अटक करण्यात आली. तथापि, तो माणूस खूप शांत होता. त्याने वाद घातला नाही. त्याने कोणतेही नाटक घडवले नाही.

विमान 17 तासांहून अधिक काळासाठी थांबवण्यात आलं

मात्र या घटनेमुळे विमानाला बराच वेळ उड्डाणासाठी थांबावं लागलं. विमानात प्रवासी धूम्रपान करताना पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, एका जोडप्याला उड्डाणादरम्यान बाथरूममध्ये धूम्रपान करताना पकडण्यात आलं होतं. TUI एअरवेजची विमान कंपनी 17 तासांहून अधिक काळासाठी थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल झाले होते.

दरम्यान विमानात धुम्रपान केल्याने तुरुंगात पाठवलं जातं की नाही हे परिस्थितीवर अवलंबून असतं पण दंड मात्र नक्कीच भरावा लागतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.