स्वातंत्र्य दिनानिमित्त HDFC MF चे मोठे पाऊल, लाँच केली Barni Se Azadi ची 5 वी आवृत्ती,गावोगावी पोहचणार गुंतवणूकीचा संदेश
Tv9 Marathi August 16, 2025 08:45 AM

Barni Se Azadi 5th Edition: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताच्या प्रमुख म्युच्युअल फंड हाऊसपैकी एक एचडीएफसी म्युच्युअल फंडने देशवासियांना अनोखी भेट दिली आहे.एचडीएफसी म्यूच्युअल फंडच्या गुंतवणूक व्यवस्थापक ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ), एचडीएफडी एसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘Barni Se Azadi’ मोहिमेच्या 5 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. हे पाऊल महिलांना पारंपारिक बचतीच्या पद्धतीच्या पुढे जाऊन गुंतवणूकीद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरित करेल.

“स्वप्नांना करा मुक्त” यावर्षीची कँपेन फिल्म

यावर्षीची कँपेन फिल्म “स्वप्नांना करा मुक्त” असून ही एका युवतीची प्रेरणादायक कहानी आहे. जी तिच्या आईच्या कौटुंबिक गरजांपूर्ण होण्यासाठी एका जारमध्ये पैसे लपवून ठेवायची. आईची मेहनत आणि त्यागातून प्रेरणा घेऊन ती एक नवा रस्ता निवडते.

ती SIP(सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान)द्वारे गुंतवणूक करते. आणि आपल्या आईचे एक बुटीक खोलण्याच्या अपूर्ण स्वप्नाला पूर्ण करते. ही कहाणी या गोष्टीवर जोर देते की खरे स्वातंत्र्य केवळ पैसे वाचून नाही तर धोरणात्मक गुंतवणूकीद्वारे (strategic investing)स्वप्नांना साकार केल्याने मिळते.

सामाजिक आंदोलन बनेल ही मोहिम

या मोहिमेच्या शुभारंभाच्या निमित्ताने बोलताना एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी आणि सीईओ नवनीत मुनोत यांनी सांगितले की गेल्या चार वर्षांत, ‘बरनी से आझादी’ही मोहिम एक सामाजिक आंदोलनात विकसित झाले आहे. जे ट्रॅडिशनल सेव्हींग सवयीपासून ( पारंपारिक बचत सवय ) स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. जे नेहमी वेल्थ क्रिएशन ( धन सृजन ) ला मर्यादित करते.

तसेच त्यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी लाँच केलेल्या या मोहिमेत आम्ही बरनीला ( पारंपारिक सेव्हींगच्या पद्धती ) बदलाचा एक शक्तीशाली प्रतिकाच्या रुपात पुन्हा परिभाषित केले, जे भारत भर महिलांना इन्फोर्म्ड, लाँग टर्म इन्व्हेंस्टमेंटच्या माध्यमाने फायनान्सिएल फ्रीडम ( आर्थिक स्वतंत्रता ) प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते. सांगायची गरज नाही खरी आर्थिक आझादी तेव्हा मिळते तेव्हा तुमचा पैसा तुमच्या सारखीच कठोर मेहनत करु शकतो.

79 पथनाट्यांद्वारे संदेश पोहचणार

79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने HDFC म्यूच्युअल फंड देशभर 79 स्थानांवर पथ नाट्याचे आयोजन करेल. ज्याद्वारे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील महिलांपर्यंत गुंतवणूकीचे महत्व पोहचवले जाऊ शकेल. ‘Barni Se Azadi’ चा वेग वाढवतानाच एचडीएफसी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट लँडस्कॅपच्या बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. जेथे प्रत्येक महिला शिकू शकेल, पुढे जाऊ शकेल आणि समृद्ध होऊ शकेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.