पिंपरी, ता. १८ : भोसरी, आळंदी रस्ता परिसरातील गणेशनगर कमान येथील मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मूर्तींची विधिवत पूजा करून मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर होम हवन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
भोसरीतील सेना नाभिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान, बिडवे, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे, वसंत लोंढे, रवी लांडगे, सतीश दरेकर, कारागृह विभागाचे दक्षता अधिकारी सुनील पगारे, व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, संजय गायकवाड, भगवानराव शिंदे, संतोष कुंभार, नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अशोक मगर, सुनील वाळुंज, महिलाध्यक्षा मंगल आढाव आदी उपस्थित होते.
यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री संत सेना महाराज मंदिरचे संस्थापक अध्यक्ष पुंडलिक सैंदाणे, अध्यक्ष मुरलीधर रायकर, नीलेश गायकवाड, नागेश भोपुलकर, भाऊसाहेब यादव, हरी शेळके, नितीन कुटे, अशोकराव पंडित, सोमनाथ शिंदे, मनोज विळस्कर, प्रमोद रसाळ, कुंडलिक काळे, तेजस पंडित, गिरीश राजूरकर, सावन सोळंकी, तुषार क्षीरसागर, सचिन राऊत, संतोष शिंदे आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक पुंडलिक सैंदाणे यांनी केले. तर, भाऊसाहेब यादव यांनी आभार मानले.