राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत इंदापूरच्या खेळाडूंची चमक
esakal August 21, 2025 11:45 AM

इंदापूर, ता. २० ः कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने वर्चस्व कायम राखत प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये इंदापूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव गाजवले.
कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने पुनगावकर मळा, श्री दत्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, मालोजीराजे छत्रपती करवीर संस्थानचे युवराज यशराजे, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी सभापती शारंगधर देशमुख, विजय संतान, राजाभाऊ घुले, धैर्यशील पुनगावकर, कुराश संघटनेचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, सहसचिव दत्तात्रेय व्यवहारे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील १९ जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेमध्ये इंदापूर येथील खेळाडूंनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना विविध वजन गटांमध्ये चमकदार कामगिरी केली. मुलींमध्ये सई शिंदे (३६ किलो), अंकिता धोत्रे (४४ किलो), श्रावणी देवकर (+४४ किलो), पलक काळे (३६ किलो), शिवानी सूर्यवंशी (४० किलो), यशिता शिंदे (४८ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवले. तर, ओंकार शिंदे (३० किलो), रणवीर गायकवाड (+५० किलो), आदित्य शिंदे (३५ किलो), ओंकार शेलार (५० किलो), आर्यन मोकाशी (५५ किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवले.
या सर्व विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त भरत शहा, मुकुंद शहा यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.