पावसाचा तडाखा...
पिंपरी : मावळ परिसर तसेच पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत मोठा पाऊस झाला. तसेच पवना धरणातील विसर्ग वाढवल्याने थेरगाव केजुदेवी बंधारा व रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. येथील केजुदेवीचे मंदिरही पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, या विसर्गामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरदेखील पाण्याखाली गेले. तेथील पटांगण आणि दर्शनबारीतही पाणी साचले. यासह पिंपरी गावातील संजय गांधीनगर, सुभाषनगर येथील घरांमध्ये पाणी गेल्याने अनेक जणांना स्थलांतरित करण्यात आले. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, ग्रेड सेपरेटरमध्ये खड्ड्यांमुळे वाहनचालक वैतागले असून, काहींना तर वाहतूक कोंडीत अडकावे लागले. तसेच साई चौकातील भुयारी मार्गात पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्याचीच ही चित्रमय झलक. (संतोष हांडे व रितेश छपरीबंद : सकाळ छायाचित्रसेवा)