नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरातून एका बातमीने सगळ्यांना धक्का बसला आहे. क्राईम ब्रांचने ऑपरेशन शक्ती अंतर्गत एका मोठ्या शरीर विक्रय करणारे मोठी रॅकेट उद्धवस्त केले आहे. यात WhatsApp वर मुलींचे फोटो दाखवून ग्राहकांशी डील केली जात होती. नंतर भाड्या रुमवर हा वेश्या व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरु होता. या प्रकरणात एका मायलेकाला अटक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काय आहे प्रकरण पाहूयात..
हुडकेश्वर लेआऊटच्या एका रुमवर देह व्यापार सुरु असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी नकली ग्राहक बनून ऑनलाईक संपर्क केला. त्यानंतर बोलणी होऊन सौदा पक्क झाला. एका युवतीला पाठवण्यासाठी एक हजार रुपये अडव्हान्स घेतले. ही रक्कम मिळताच आरोपीपर्यंत पोहचलेल्या पोलिसांनी घरावर छापा टाकला. यात आई आणि मुलाला अटक केली आहे.
आई आणि मुलाला अटकपोलिसांच्या चौकशी आरोपीचे नाव सुनीता विकास आणि यश कांबळे असे आहे. दोन्ही आरोपी सहा महिन्यांपासून हा रुम भाड्याने घेऊन येथे देहव्यापार चालवत होते. यासाठी आरटीओची खाजगी काम करण्याच्या नावाखाली हा रुम भाड्याने घेतला होता. परंतू येथे कुंटणखाना सुरु होता. या ठीकाणाहून एका २७ वर्षांच्या महिलेची सुटका करण्यात आली. ही तरुण छत्तीसगड येथील रहिवासी आहे. पैशांची लालूच दाखवून नागपुरला तिला आणण्यात आले होते.
सुनीता आणि यश हे मायलेक हुशारीने काम करायचे. केवळ श्रीमंत आणि प्रीमीयम ग्राहकांना टार्गेट करायचे. आणि आता व्हॉट्सअपवर तरुणीचा फोटो पाठवायचा आणि नंतर ग्राहक पसंद असलेली मुलगी निवडायचा आणि नंतर अडव्हान्स रक्कम घ्यायचे. सौदा पक्का झाल्याने मुलीला ग्राहकाकडे पाठवले जायचे. छाप्या दरम्यान पोलिसांनी 94,700 रुपयांची सामुग्री जप्त केली आहे.ज्यात 63,500 रुपये रोख आणि 31,000 रुपयांचे चार मोबाईल फोनचा समावेश आहे.
या ठिकाणी सुटका केलेल्या मुलीचे मेडीकल तपासणी केली. याआधी १४ ऑगस्ट रोजी ऑपरेशन शक्ती अंतर्गत सीताबर्डी परिसरातून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. मंगलम अपार्टमेंटमध्ये ‘लुक बुक बाय इनारा यूनिसेक्स सलून’ च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता.