जुन्नर : इंगळूण ते आंबे-हातवीज घाट रस्त्यात मुसळधार पावसाने आज (ता.२०) रोजी दरड कोसळली. जून महिन्यात देखील दरड, माती, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. पावसाळ्यात घडणाऱ्या सततच्या घटनांमुळे घाटातील प्रवास धोक्याचा झाला असल्याचे हातवीजचे माजी पोलीस पाटील अनंता पारधी यांनी सांगितले.
डोंगरमाथ्यावर असणाऱ्या पठारावर सुकाळवेढे, पिंपरवाडी, आंबे, हातवीज,लेंभेवाडी, कोकणेवाडी आदी गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना दळणवळणाचा हा एकच मार्ग आहे. या मार्गावरील अडचणीबाबत पाचही गावच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन पावसाळ्यात घाटातील होणाऱ्या दुरावस्थेची दखल घ्यावी अशी विनंती केली होती. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिले नाही.यामुळे अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात आले.
Indian Railway: गणेशोत्सवात रेल्वे सोडणार ३००हून अधिक गाड्या, मुख्यमंत्र्यांची घोषणा, म्हणाले...जुन्नर पासून सुमारे ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ह्या गावांच्या वाहतूक सुविधेसाठी घाटाचे रुंदीकरण केले परंतु बाजूने पाणी जाण्यासाठी गटार अद्याप काढली नाही.या ठिकाणी सरासरी १५०० ते २००० मिली मीटर पाऊस पडतो. डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खराब होतो. दरड कोसळण्याची भीती असते.यासाठी घाटरस्त्याचे वळणावर ठिक ठिकाणी कठडे बांधावेत गटर काढावी यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
पिंपरवाडी पोलीस पाटील विष्णू घोडे यांनी मागील वर्षी देखील अशा घटना घडल्या घाटात मोठे दगड कोसळल्याने समस्या निर्माण होतात. दरवर्षी याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी लक्ष द्यावें अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
घाटरस्त्यावर येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटर तसेच आवश्यक तेथे मोऱ्यां काढणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत असते यामुळे वाहन चालविणे जोखमीचे होते. पावसाळ्यात आजारी व्यक्तीला जुन्नरला दवाखान्यात न्यायचे असेल तर अडचणीचे होते.रस्त्यावर पाणीच पाणी झालेले असते.
इलेक्ट्रिक थ्री प्लगमधील पिनांना काय म्हणतात? तिसऱ्या पिनेचा उपयोग काय?आदिवासी बांधवाना मुलांच्या शाळा प्रवेश तसेच शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे, दाखले काढण्यासाठी जुन्नरला यावे लागते पावसाळ्यात दरड कोसळल्यास त्यांची गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.