Cyber Scam: 'वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद' अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा
esakal August 25, 2025 06:45 AM

बजाजनगर : वॉटर बिलसाठी आजच ॲप डाउनलोड करा, अन्यथा कंपनीचे पाणी कायमचे बंद होईल’ अशी बतावणी करून सायबर भामट्याने वाळूज एमआयडीसीतील उद्योजकाची तब्बल ५३ लाख ८१ हजार चार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली.

याप्रकरणी भगवानदास आहुजा (वय ८१) यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

अशी झाली फसवणूक

आहुजा यांनी सुरवातीला अनभिज्ञता दाखविली असता, त्याच व्यक्तीने (दिव्येश जोशी नावाने ओळख सांगितली) त्यांना मार्गदर्शन करण्याचे नाटक केले. त्याने नेट बँकिंगसंबंधीची माहिती विचारून घेतली. यानंतर आहुजा यांचा मोबाइल अचानक हँग झाला; मेसेज आणि ई-मेलही बंद पडले. पुढील दोन दिवस त्या व्यक्तीकडून वारंवार ‘फॉर्म खूप मोठा आहे, नेटवर्क स्लो आहे, मी अपडेट करून कॉल करतो’, असे सांगण्यात आले. परंतु, नंतर कोणताही कॉल आला नाही.

काय आहे प्रकार?

भगवानदास आहुजा हे बजाजनगर येथील रहिवासी असून, त्यांची वाळूज एमआयडीसी येथील ई-सेक्टरमध्ये मारुती एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. १४ ऑगस्टला आहुजा यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आला, त्यात लिहिले होते की, ‘वॉटर बिल अपडेट एपके’ या अॅपवर जाऊन आजच अपडेट करा, अन्यथा तुमच्या कंपनीचे पाणी कनेक्शन कायमचे बंद होईल.’ त्यानंतर आहुजा यांनी मेसेजमधील अॅप डाउनलोड केले. त्यात ‘१३ वर्षांसाठी १३ रुपये पेमेंट करावे लागेल’ असा पर्याय दिसला. याचवेळी एका व्यक्तीने स्वतःला वॉटर ऑफिसचा अधिकारी सांगत व्हॉट्सअॅप कॉल केला. त्याने आग्रह धरला, की पेमेंट नेट बँकिंगद्वारेच करावे लागेल.

Bike Accident: बैलपोळा निमित्त गावातून परत येत असताना दुचाकीचा धक्का, उपचारादरम्यान निधन; संपूर्ण कुटुंबावर शोककळा ...अन् खात्यातून ५३.८१ लाख झाले डेबिट

दोन दिवसांपासून मागे लागलेल्या व्यक्तीचा फोन न आल्याने शेवटी आहुजा यांनी मुलाला संपर्क करून बँकेत जाण्यास अकाउंट चेक करण्याचे सांगितले, तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या दोन एफडीसह खात्यातील एकूण ५३ लाख ८१ हजार चार रुपये परस्पर डेबिट झाले आहे. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच आहुजा यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. अखेर त्यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.