नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : घणसोलीमध्ये खासगी शिकवणी चालवणाऱ्या व्यक्तीने १० वर्षीय मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
घणसोलीतील खासगी शिकवणीत १० वर्षीय विद्यार्थिनी जात होती. गुरुवारी सायंकाळी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे गेली होती. रात्री ९ च्या सुमारास पीडित मुलगी एकटीच असताना क्लासचालकाने मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ तिला दाखवले. पीडित मुलीची आई तिला घेण्यासाठी आली असताना तिने हा प्रकार तिला सांगितला. या वेळी मुलीच्या आईने क्लासचालकाच्या मोबाईल फोनची तपासणी केली, मात्र त्यापूर्वीच त्याने व्हिडिओ डिलीट केले होते. या प्रकारानंतर रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.