बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मोर्च्याच्या आयोजनासाठी बैठक घेतली. या इशारा बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बीडमधील इशारा बैठकीवेळी डीजेवर गाणी लावण्यास बंदी घातली होती. यावरून मनोज जरांगे पाटील थेट सरकारवर कडाडले. फडणवीसांनी पोलिसांना चिल्लर चाळे करायला लावले. पण लक्षात ठेवा आज सत्ता आहे, उद्या नसेल अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इथं आल्यावर कळलं की डीजेवर नुसता पखवाजच वाजला. गाणं एकही वाजेना. समाजाला अडचण नाही डीजे नाही वाजू दिला तरी. पोलीस अधिकार्यांना सांगतो की सत्ता येत असते जात असते. मी खुनशी औलादीचा आहे की माझ्या डोक्यात एखादा बसला की त्याचा बाजार उठवतो. धमकी नाही, समजून सांगतो. बीड जिल्ह्यात दुसऱ्या कुणाचा डीजे वाजूदे मग सांगतो. डीजे म्हणजे दहशतवाद्यांच्या बंदुका आहेत का? डीजेवर आमचं पोट चालतंय का? बंद तर बंद, पुढचा काळ लक्षात ठेवा, जशास तसं. कुठं कुठं डिजे वाजतो तिथं बारीक लक्ष ठेवायला लागतो. विनाकारण कशाला लोकांना डिवचता., चाललंय ना शांततेत आमचं.
चलो मुंबई! शेवटची फाइट, गुलाल उधळूनच परतायचं; जरांगेंचा सरकारला इशारा, २९ ऑगस्टला कसं असेल नियोजनतुम्हाला बढती मिळावी म्हणून लढतोय हा पठ्ठ्या. समजा दुसऱ्याचा असला, तर कुठे ना कुठे होणारच आहे, डीजे वाजेल. गावागावात लोक आहेत आमचे. देवेंद्र फडणवीस त्याच्या. असले चिल्लर चाळे करायला लावतो व्हय डीवायएसपीला, शांततेत जायचंय, तुम्ही विनाकारण डिवचताय. डीजे काय विषय आहे का, फडणवीसचं ऐकून दंगल घडवायची होती का? असा प्रश्नही जरांगेंनी विचारला.
पोलीस असला तरी फडणवीसचं ऐकून भानगडीत पडू नका, कधी ना कधी सत्ता बदलेल. तेव्हा आम्ही नाव ध्यानात ठेवू. मला बोलायचं नव्हतं पण जिव्हारी लागलं. फडणवीसचं ऐकून लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही. पोलिसांनी आम्हाला त्रास देण्याऐवजी महादेव मुंडेचे आरोपी धरा. ते दाखवा आम्हाला असं आव्हान जरांगेंनी पोलिसांना दिलं.
मराठा आरक्षण दिलं नाहीत तर काय करणार ते आता मुंबईत येऊनच दाखवू. फडणवीस साहेबांनी डीजे बंद करायला लावले. ही चूक केली. ती करायला नको होती. आता सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच घेणार असं जरांगेंनी ठणकावून सांगितलं.