मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 27 तारखेला आंतरवाली सराडीतून मुंबईकडे निघणार आहेत त्या आगोदर मराठा आंदोलक मनोज जरांगे बीडच्या बालाघाटावर दाखल जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जेसीबी मधून फुलांची उधळण मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार. अवघ्या काही वेळात सभेला सुरुवात.
नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद- नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद
- मंदिरातील घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद, व्हिडिओ व्हायरल
- यापूर्वीही मंदिरात झाला होता दानपेटी वरून वाद
- कपालेश्वर मंदिर परिसरात दोन परिवारात ही तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती
- दानपेटीचा ताबा घेण्यावरून ही हाणामारी झाल्याची चर्चा
पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवलीपालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली.
पूरग्रस्त असलेल्या गावकऱ्यांना मदत न मिळाल्याने गावकरी आक्रमक.
सात दिवसानंतर पालकमंत्री अतुल सावे पूरग्रस्त हसनाळ दौऱ्यावर.
पालकमंत्री अतुल सावे आज नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ यास पूरग्रस्त गावात देत आहेत भेट.
पालकमंत्री अतुल सावे लंडन हून सात दिवसानंतर आले पाहणी करण्यासाठी पूरग्रस्त भागात.
पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर गावकऱ्यांचा संताप.
गावात कुठलीही मदत पोहोचली नसल्याने गावकरी आक्रमक.
साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढसाई भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे.. साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव 50 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.. पूर्वी 20 रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता 30 रुपयांना मिळणार आहेत.. या दरवाढीमुळे साईभक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे..
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बैठकीसाठी बीडच्या दिशेने रवानाबीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथे होणाऱ्या आजच्या इशारा बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी मधून रवाना झालेले आहेत.
29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटील यांची बैठक पार पडत आहे...
29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनापूर्वी असलेल्या बैठकीला महत्त्व..
इशारा बैठकीतून मनोज जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे...
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणाओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे आंदोलन हे ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून पैसे घेऊन सुरू आहे.
त्यांच्या आंदोलन कमर्शियल पध्दतीने सुरू आहे.
जिथे खोके तिथे हाके अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी निशाणा साधला आहे.
लक्ष्मण हाके यांचा अलीकडेच माळी समाजाविषयी वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाला आहे
मुंबई गोवा महामार्गावर इंदापुर आणि माणगावमध्ये वाहनांच्या रांगा० वाहतुक संथ गतीने
० गणेश भक्तांच्या कोकणच्या प्रवासात वाहतुक कोंडीच विघ्न येण्याची शक्यता
० सकाळपासून वाहतुक सुरळीत होती मात्र काही वेळापासून वाहनांच्या रांगा लागण्यास झाली सुरुवात
० गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत चालली
मराठा समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजीओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर अडाणी असा शब्द वापरून टीका करत आहेत.
याच टीकेला आता मराठा समाजाच्या बैठकीतून उत्तर देण्यात आले आहे. माळशिरस तालुका मराठा समाजाच्या बैठकीत "हाकेला सांगा आता कुठ जायचे मुंबईला जायचे..." अशी घोषणाबाजी करण्यात आली.
तर हाके तु शिकलेला पण समाजाला विकलेला आहे. अशा टिका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी आज पंढरपुरात केली.
सोलापूर जिल्ह्याततू 25 हजार गाड्या मुंबईला जाणारआरक्षण मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची तयारीसाठी आज मराठा समाज बांधवांची पंढरपुरात बैठक झाली .
पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत.
तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक पंचवीस हजार गाड्या मुंबईत जाणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिली आहे.
येवल्यातील तळवाडे विठ्ठलवाडी रस्त्याची दुरवस्था,आगामी स्थानिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणारनाशिकच्या येवला तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे,
तळवाडे विठ्ठलवाडी हा या रस्त्याची तर अगदी वाट लागल्याने रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थी, वाहनधारक यांचे प्रचंड हाल होत असल्याने गेल्या अनेक वर्षपासून रस्त्याची दुरवस्था दूर करावी अशी मागणी करून सुद्धा त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने या ठिकाणच्या महिला संतप्त झाल्या असून रस्त्याचे काम न झाल्यास आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकून उमेदवारांना इकडे फिरकू देणार नसल्याचा इशारा महिलांनी दिलाय
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात सर्वाधिक पावसाची नोंदसातपुडा परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस....
थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला 67 मिलिमीटर पावसाची नोंद...
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी 114.8 मिलिमीटर....
अक्राणी तालुक्यातील रोशमाळ ,अक्राणी - 66 मिलिमीटर....
नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीन मंडळात 65 एमएम पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संत्रधार पाऊस सुरू असल्याने धरणातून पुढे पाण्याचा विसर्ग सुरू
- सद्यस्थितीत गंगापूर धरणातून ६९८ क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
- संततधार पावसामुळे गंगापूर धरण ९५ टक्के भरलं
- धरणात नव्याने पाण्याची आवक होत असल्याने पाणी सोडायला सुरुवात
मुसळधार पावसामुळे देवगोई घाटात कोसडली दरडअक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात दरड कोसळल्याने घाटमार्ग बंद....
उंचकडे वरील मलबा घाट वळणावर कोसळल्याने वाहतुकीस अडचण....
देवगोइ घाटात जीव धोक्यात घालून प्रवाशांना काढावी लागत आहे वाट.....
मनोज जरांगे पाटलांची बीडच्या बाळा घाटावरून तोफ धडाणणारमराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील 27 तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करणारआहेत
या पार्श्वभूमीवर आज बीडच्या मांजरसुंबा येथील बालाघाटावर आज निर्णायकअंतिम इशारा सभेचे आयोजन करण्यात आल आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जेसीबी त्याचबरोबर किरण च्या साह्याने जरांगे पाटलांचा स्वागत होणार आहे
मोठमोठे होल्डिंग कट आउट त्याचबरोबर फुलांची उधळण जरांगे पाटला वरती होणार आहे
धाराशिवच्या तुळजापूरमध्ये उभारले जाणार मराठवाड्यातील दुसरे प्राणी संग्रहालयधाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वनविभागाच्या जागेत मराठवाड्यातील दुसरे प्राणीसंग्रहालय उभारले जाणार आहे.
प्राणी संग्रहालयात वाघ,सिंह,जिराफ यासारखे प्राणी असणार आहेत.
प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची आमदार जगजितसिंह पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यासह पाहणी केली.
पुढील पंधरा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वनविभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरामराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाव या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील दोन वर्षापासून आंदोलन करीत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सात वेळा आमरण उपोषण केले असून एकदा मुंबई वारी देखील केली आहे.
आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला आंदोलन करणार आहे.
त्यासाठी मनोज जरांगे पाटील 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून 29 ऑगस्टला ते मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे.
सांगोल्यात लांडग्यांचा धुमाकूळ, लांडग्यांचा 9 जणांवर हल्लाजखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू...
सांगोल्याच्या धायटी,एकतपूर,चिंचोली परिसरात
लाडग्यांची दहशत....
लाडग्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी ...
वन विभागाकडून लाडग्याच्या शोध सुरू...
Nashik: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यूगोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू
गोसीखुर्द धरणाच्या बेलघाटा जवळील उजव्या कालव्यात चितळ पडलं होतं.
याची माहिती मिळताचं पवनी वन विभागाच्या RRT पथकानं कालव्याच्या खोल पाण्यात उतरतं चितळाचं मोठ्या अथक प्रयत्नांनं सुखरूप रेस्क्यु केलं.
सध्या गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं कालव्याच्या प्रवाहित पाण्यात उतरून चितळाचं रेस्क्यू करताना मोठी अडचण निर्माण होत होती.
मात्र, RRT पथकं आणि वन कर्मचाऱ्यांनी चितळ सुखरूप बाहेर काढून त्याला वन अधिवासात सोडलं.
Nashik: शॉर्ट सर्किटमुळे ई- सेवा केंद्राला आग लागून कागदपत्रे जळून खाकनाशिकच्या बागलाणमधील करंजाड येथील शिवराय कम्प्युटर अँड महा ई सेवा केंद्र चालवणाऱ्या हर्षल भामरे यांच्या केंद्रात मध्य रात्रीच्या सुमारास शर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली असून या आगीत केंद्रातील संपूर्ण साहित्य, कागदपत्रे या सह अन्य मशनिरी साहित्य जळून खाक होऊन भामरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,विशेष म्हणजे 5 ते 6 गावातील नागरिकांना या ई सेवा केंद्राचा मोठा आधार होता. मात्र ते संपूर्णतः जळून गेल्याने परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
Nagpur: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यूनागपूर -
- नागपूरच्या भिवापूरात भरधाव कारच नियंत्रण सुटून भीषण अपघात, मरु नदीच्या पुलावरून 35 ते 40 फूट खाली कार नदीपात्रात पडून अपघात..
- सकाळी 8 वाजताच्या सुमारास नीरजकडून उमरेडला जातांना वळणावर नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज...
- यात सागर वाघमारे अस तरुणाचा नाव आहे, चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती.
Konkan: रत्नागिरी- कोकणात गणेशोत्सवासाठी कोंकणवासी येण्यास सुरुवातरत्नागिरी- कोकणात गणेशोत्सवासाठी कोंकणवासी येण्यास सुरुवात
कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोंकणवासी कोकणात दाखल
तीन दिवस अगोदरच कोंकणवासी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल
गणपतीच्या स्वागतासाठी लाखो कोंकणवासी कोकणात
कोकणवासीयांना गणेशोत्सव आगमनाचे लागले वेध
गणपती स्पेशल ट्रेन ने कोकणवासी कोकणात दाखल
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरती 325 हून अधिक फेऱ्या
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे कडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन
कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल
सहा ते सात लाख भाविक गणेशोत्सव ट्रेनने येणार गणेशोत्सवासाठी कोकणात
अनेक ट्रेन उशिरा धावत असल्याने तसेच बुकिंग तिकीट वरून उडणाऱ्या गोंधळावर कोंकणवासियांची नाराजी
Nashik: नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हेनाशिक -
- नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला केलेले मारहाण प्रकरण
- मारहाण करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिक मराठी नागरिकांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
- जय भवानी रोड परिसरात शुक्रवारी सायंकाळी वैद्यनाथ पंडित यांना करण्यात आली होती मारहाण
- गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झाला होता वाद
Ahilyanagar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर, संगमनेरमध्ये रोड शो आणि आभार सभाअहिल्यानगर -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेर दौऱ्यावर
आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन
संगमनेरमध्ये रोड शो आणि आभार सभा
दुपारी 4 वाजेच्या दरम्यान शिंदे पोहचणार संगमनेरमध्ये
काही दिवसांपूर्वी कीर्तनात झालेल्या राड्यानंतर आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप प्रत्यारोप
आरोप प्रत्यारोपाणे राजकीय वातावरण तापले
एकनाथ शिंदे आजच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्यावर काही बोलणार का? याकडे लक्ष...
Junnar: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती दिनानिमित्ताने गि-हारोहकांनी गडकिल्यांवरुन दिली सलामीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्ग नांदगीरवाडी, अंतुर, सुतोंडा, लोंझा आणि पेडका या पाच दुर्गांना दोन दिवसांत ३२ किलोमीटरची पायपीट करीत सर करीत पुण्याच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भारतीय तिरंगा ध्वज फडकावित "हुतात्मा राजगुरू अमर रहे", "भारत माता की जय", "वंदे मातरम" या घोषणा देत हुतात्मा राजगुरूंना वंदन केले.
Solapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रासोलापूर -
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर ते अयोध्या दर्शन यात्रा
- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भाविक अयोध्येला रवाना
- सोलापूर ते अयोध्या, मथुरा, काशी आदी तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेऊन हे भाविक सोलापूरला परतणार आहेत
- मोहोळ तालुका भाजपच्यावतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आलेय
- यावेळी भाविकांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला
Pune: अष्टविनायकांपैकी रांजणगाव महागणपतीच्या महाद्वार यात्रेची सुरूवातअष्टविनायकांपैकी रांजणगाव महागणपतीच्या महाद्वार यात्रेची सुरूवात
आज पहाटे तीन वाजता झालेल्या महापूजा-आरतीनंतर भाविकांसाठी रांजणगाव महागणपतीच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले
याचसोबत भाद्रपद द्वार यात्रा उत्सवाची सुरुवात झाली.
Pune: शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर? द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनाला लावणार हजेरीपुणे -
शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर?
पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशनाला दोघे नेते एकत्र येणार?
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान सुद्धा राहणार उपस्थितीत
पिंपरी चिंचवड मधील हॉटेल मध्ये अधिवेशनाचे आयोजन
सकाळी १० वाजता अधिवेशनाला होणार सुरुवात
Yavatmal: आवाजाची मर्यादा पाळत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा, पोलिस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आवाहनआवाजाची मर्यादा पाळत डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा
यवतमाळ पोलिस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आवाहन
आगामी गणेशोत्सव साजरा करताना 75 डेसिबल आवाजाची मर्यादा पाळा
डीजेमुक्त आणि दारूमुक्त गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करा
यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे आवाहन
Shahapur: दि मुंबई को -ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत भानुदास महाराज भोईर विजयीदि मुंबई को -ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र भानुदास महाराज भोईर हे दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी.
भानुदास महाराज भोईर यांच्या पॅनल चा विजयी 19 पैकी 13 जागेंवर विजयी
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय
Thane: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हालठाणे -
- गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल
- ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी
Pune: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे -
पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून आता पुन्हा उन्ह पावसासह हलक्या सरींचा खेळ सुरू
रायगड जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता