सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारत-पाकिस्तान सामन्यांवरून जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असाल, महाराष्ट्रातील ज्या महिलांनी आपले कुंकू गमावले, त्यांच्या कुंकवाची त्यांना कदर असेल, तर ते अशी विधाने करणार नाहीत, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारत-पाक क्रिकेट सामन्यांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. संपूर्ण भाजप हे अर्धवट ज्ञानी आहेत. काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो. त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचे व्हिडीओ पाहिले पाहिजेत. एकवचनी या पुस्तकात बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका मांडली. दिलीप वेंगसरकर अचानक जावेद मियादला घेऊन मातोश्रीवर आले. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करु नका, पुन्हा सुरु करा, ही विनंती करण्यासाठी ते बाळासाहेबांकडे आले होते. तेव्हा बाळासाहेबांनी दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही, असे सांगितले आहे. तुमच्या नरेंद्र मोदींसारखे शेपूट घालणारे नाहीत, असे संजय राऊत म्हटले.
कुंकवाची कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीतऑपरेशन सिंदूरच्या वेळी रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असे मोदी म्हणाले. चहा प्या आणि निघून जा, असे बाळासाहेबांनी तोंडावर मियादला सांगितलं. याबद्दल तुम्ही दिलीप वेंगसरकर यांना विचारु शकता. देवेंद्र फडणवीस खरंच राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी असतील. महाराष्ट्रातील ज्या महिलांचे कुंकू पुसलं, त्या कुंकवाची कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. जावेद मियाद सोड ना.. आताच बोला, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहाततुम्ही बेल्जियममध्ये आरशाची फॅक्टरी काढली. तिथे चांगले आरशे मिळतात. तिथे तुमच्या आरशाची फॅक्टरी आहे ना, त्यात पाहा, तुम्ही त्या विवस्त्र दिसाल. तुम्ही स्वतला विवस्त्र पाहाल. पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का इतकंच हो की नाही हे सांगा. हे फालतू जावेद मियादाद, वासिम अकरम वैगरे बोलू नका. भाजपने पाकड्यांसमोर पैशांसाठी शेपूट घातलं आहे. तुम्ही कोणाची तरफदारी करताय. काल काही लाडक्या बहिणींना राखी बांधून घेतल्यात. ज्या २६ महिलांचे कुंकू पुसले त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत. भाजप म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे. जावेद मियादादचा विषय किती वर्षे काढताय. पंडीत नेहरु काढतात. त्यापेक्षा स्वत:च बोला. तुम्ही स्वत: उघडे नागडे पडले आहात, ते पाहा, अशी टीका संजय राऊतांनी केली.