हृतिक रोशन हा त्याच्या चित्रपट आणि अभिनयासोबत, त्याच्या डान्ससोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. हृतिकचा पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत चर्चेत होतं. पण शेवटी त्याच्या आयुष्यात आलेली एक अभिनेत्रीद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ती अभिनेत्री म्हणजे सबा आझाद.
हृतिकने त्याचं घर प्रेयसी सबा आझादला भाड्याने दिले आहे
त्याने सबासोबतच आपलं नात जगजाहीर केलं. सबा त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. दोघेही आता एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो वैगेरे पोस्ट करत असतात. पण आता बातमी आहे की हृतिकने त्याचं घर प्रेयसी सबा आझादला भाड्याने दिले आहे. ज्यासाठी हृतिक त्याच्या प्रेयसीकडून दरमहा भाडेही घेणार आहे. परंतु त्याने हे अपार्टमेंट सध्या त्या अपार्टमेंटच्या किमतीपेक्षा खूपच कमी भाड्याने दिले आहे.
सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट सबा आझादला भाड्याने दिले आहे.
अलिकडेच, अशी चर्चा आहे की हृतिक रोशनने त्याचे सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट सबा आझादला भाड्याने दिले आहे. जे मन्नत अपार्टमेंटमध्ये आहे. तसेच, हे मुंबईतील पॉश एरिया जुहू आणि वर्सोवाला जोडते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे अपार्टमेंट1000-1,300 चौरस फूट जागेत बांधले गेले आहेत. ज्याचे भाडे सध्या 1 लाख ते 3 लाखांच्या दरम्यान आहे.
हृतिक सबाकडून किती घेणार घरभाडे
मीडिया पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशनने त्याचे अपार्टमेंट गर्लफ्रेंड सबा आझादला 75000 रुपयांना भाड्याने दिले आहे. म्हणजेच तो दरमहा तिच्याकडून 75 हजार रुपये घेणार आहे. त्याच वेळी, त्याची गर्लफ्रेंड सबा हिने 4 ऑगस्ट रोजी करारावर स्वाक्षरी केली आहे. खरं तर, अभिनेत्याने 2020 मध्ये या ठिकाणी तीन अपार्टमेंट खरेदी केले होते. त्यापैकी एक 19,20 व्या मजल्यावर डुप्लेक्स असं अपार्टमेंट खरेदी केलं आहे आणि 18 व्या मजल्यावर एक अपार्टमेंट आहे. ज्यासाठी सबा आझादने 1. 25 लाख रुपये देखील जमा केले आहेत. खरं तर, रोशन कुटुंब मुंबईत मालमत्ता खरेदी करत आहे. ज्यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात.
खरंतर 2020 मध्ये हृतिक रोशनने तीन अपार्टमेंट खरेदी केले होते. ज्याची किंमत त्यावेळी 97.5 कोटी रुपये होती. तर 2025 मध्येच हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी तीन अपार्टमेंट विकले होते. पहिले वडील आणि मुलगा चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रेयसीला भाडेकरू बनवले.
12 वर्षांनी लहान असलेल्या सबाला डेट
51 वर्षीय हृतिक रोशन त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या एका सबाला डेट करत आहे. ते 2022 पासून एकत्र आहेत. त्यांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. हे जोडपे सुट्ट्यांचा आनंद घेतानाही दिसते. त्यांनी सुट्ट्यांमधील रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. सबा आझाद देखील सतत ओटीटीवर काम करत आहे. हृतिकच्या घरी काही मोठे प्रोजेक्ट आहेत.
आपल्या ‘वॉर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट अद्याप वसूल झालेले नाही. 400 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.