संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आज अतिवृष्टी झाली. अनेक शासकीय आणि खाजगी इमारतींना पाण्याने वेढा घातला होता. यामुळे अनेकाना कार्यालयात पोहोचता आले नाही. पण अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर या चक्क ट्रॅक्टरवर बसून न्यायालयात आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोहोचल्या. तसेच एक वकील जेसीबीमध्ये बसून न्यायालयात पोहोचले. या दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अर्धापूर परिसरात मुसळधार पाऊस पडला. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. शेतांनाही तळ्याचे स्वरूप आले आहे. मुसळधाप पावसामुळे अर्धापूर न्यायालयाला आज पाण्याने वेढा घातलेला होता, त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे न्याय दंडाधिकारी ट्रॅक्टरवर बसून न्यायदानासाठी पोहोचल्या. तसेच एक वकील जेसीबीमध्ये बसून नायालयात पोहोचला.
मुसळधार पावसामुळे न्यायालयात पोहोचणे अवघड झाले होते. त्यामुळे अर्धापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर डी सुरेकर यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने न्यायालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ट्रॅक्टरवरील प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे. तसेच जेसीबीच्या मदतीने न्यायालयात पोहोचणाऱ्या वकिलाचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
वकील जेसीबीने तर न्यायाधीश ट्रॅक्टरवरुन पोहोचले न्यायालयात, नांदेडमधील Video व्हायरल#nanded #nandedrain #HeavyRain pic.twitter.com/7gvWkTRn9L
— TV9 Marathi (@TV9Marathi)
आर डी सुरेकर यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले की, ‘नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणतीही अडचण असो, जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ तर दुसऱ्या एकाने कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही असं म्हटलं आहे. आणखी एकाने ‘आर डी सुरेकर यांचे समर्पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे’ असं विधान केलं आहे.
अनेकांना प्रेरणा मिळालीमुसळधार पावसामुळे अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये पोहोचत नाहीत. मात्र आर डी सुरेकर यांचे हे धाडसी पाऊल नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहे. अनेकांनी यातून प्रेरणा घेतली आहे. काहींनी प्रत्येक कर्मचाऱ्याने आर डी सुरेकर यांचा आदर्श घ्यावा असं म्हटलं आहे. कारण आर डी सुरेकर यांनी कठीण परिस्थितीत प्रवास करत न्यायदानाचे काम केले, ही खरोखरच कौतूकास्पद बाब आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.