PKL 2025: 'टाय-ब्रेकर्स तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, आणि त्यातूनच आम्ही सामना जिंकलो', यू मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार
esakal September 01, 2025 03:45 PM
  • प्रो कबड्डी लीग 2025 मध्ये यू मुम्बाने गुजरात जायंट्सविरुद्ध टाय-ब्रेकर्समध्ये 6-5 असा विजय मिळवला.

  • कर्णधार सुनील कुमारने टाय-ब्रेकर फॉरमॅटचे कौतुक केले आणि संयमाने खेळल्यामुळे विजय मिळवला असे सांगितले.

  • हा विजय संघाच्या आत्मविश्वासाला बळकटी देणारा ठरला.

प्रो कबड्डी लीग हंगाम 12 मध्ये यू मुम्बाने आपल्या मोहिमेची सुरुवात रोमांचक विजयाने केली. गुजरात जायंट्सविरुद्धचा सामना 29-29 अशी बरोबरीत संपला आणि टाय-ब्रेकर्समध्ये यू मुम्बाने 6-5 अशी बाजी मारली.

विश्वनाथ स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेला हा सामना हंगामातील पहिल्या तीन सामन्यांपैकी दुसरा होता, जो टाय-ब्रेकर्सपर्यंत गेला आणि प्रेक्षकांना अखेरच्या रेडपर्यंत खिळवून ठेवला.

Pro Kabaddi League 2025: 'लालबागच्या राजा'च्या चरणी पोहोचली PKL ट्रॉफी; राष्ट्रीय क्रीडा दिनी १२व्या हंगामाचा शुभारंभ

कर्णधार सुनील कुमारने टाय-ब्रेकर फॉरमॅटचे कौतुक केले आणि त्याला उत्साहवर्धक व स्वागतार्ह बदल म्हटले. सुनील सामन्यानंतर म्हणाला, "टाय-ब्रेकर्समध्ये शांत राहणे सर्वांत महत्त्वाचे असते.अशा क्षणी तुम्हाला स्वतःच्या प्रवृत्तीवर विश्वास ठेवावा लागतो आणि डोक्याने खेळावे लागते. हाच संयम आज आम्हाला विजय मिळवून देणारा ठरला।"

गुजरातचा स्टार डिफेंडर मोहम्मदरेझा शादलुई याच्याशी टाय-ब्रेकर्समधील निर्णायक क्षणाबद्दल सुनील म्हणाला, "तो अतिशय तीव्र क्षण होता। त्याने माझ्याकडून गुण काढण्याचा प्रयत्न केला, पण अशा वेळेस अनुभव फरक करून दाखवतो. अशा सामन्यांमधून अगदी छोट्या फरकाने निकाल कसा ठरतो हे दिसते."

हंगामाच्या पहिल्याच सामन्यात मिळालेल्या कडव्या विजयाचे महत्त्व सांगताना सुनील म्हणाला, "टाय-ब्रेकर्समध्ये पहिला सामना जिंकणे आत्मविश्वास निर्माण करते। हे आमच्या संघाची ताकद आणि एकजूट दाखवते आणि मोठ्या हंगामासाठी विश्वास देते। लीग नुकतीच सुरू झाली आहे, पण हा विजय योग्य लय निर्माण करणारा आहे."

Pardee Narwal: निवृत्ती घेतलेल्या डुबकी किंगच्या कर्तृत्वाला सलाम; Pro Kabaddi 12 च्या उद्घाटनापूर्वी विशेष सन्मान 31 ऑगस्टच्या सामन्यांचे पूर्वावलोकन

पहिल्या विजयावर स्वार झालेल्या तमिळ थलाइवाज आणि यू मुम्बा दोन्ही संघांना विजयी धडाका कायम ठेवायचा आहे. थलाइवाजच्या रेडिंग लाईनमध्ये यंदा अर्जुन देशवाल असल्यामुळे सुनील कुमारच्या नेतृत्वाखालील डिफेन्सला कठीण आव्हान असेल.

दुसऱ्या सामन्यात विद्यमान विजेते हरियाणा स्टीलर्सचा सामना बंगाल वॉरियर्सशी होईल. वॉरियर्सचे नेतृत्व यंदा नवीन कर्णधार देवांक दलाल करणार असून त्यांचा खेळ निर्णायक ठरणार आहे. जयदीप आणि त्यांची डिफेन्स स्टीलर्सला खिताबाच्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायला प्रवृत्त करेल. सर्वांची नजर नवीन कुमारवर असेल, जो सहा हंगामांनंतर पहिल्यांदाच नव्या संघासाठी खेळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.