Electric Shock : बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू; सळई ओढताना घडली दुर्घटना
Saam TV September 01, 2025 03:45 PM

अमळनेर (जळगाव) : बांधकामाच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर साहित्य नेण्यासाठी असलेली लिफ्ट बंद पडली होती. यामुळे कारागीर वरच्या मजल्यावर सळई नेत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसला. यात एका कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरात घडली आहे. या प्रकरणात ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरात घडलेल्या या घटनेत विनायक रतीराम नाईके (रा.सुदामापुरी सिंहाळा, खंडवा मध्यप्रदेश) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे. दरम्यान चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ ठाकुरदास चांदवाणी यांच्या एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी विनायक नाईके हा सेन्ट्रिंग काम करत होता. तर या ठिकाणी असलेली कामावरची पुली बंद पडली होती. तर यासाठी दुसरी कोणती पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. 

Yawal Crime News : किरकोळ वादातून शस्त्राने वार करत हत्या; हत्येनंतर मारेकरी पोलिसात जमा

सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरु 

दरम्यान पुली बंद असल्याने राजाबाबू याने विनायक यास पाचव्या मजल्यावरून लोखंडी सळईला दोरी बांधून ओढायला सांगितले. त्यानुसार सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरू झाली आणि लोखंडी सळई लिफ्टच्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने विनायक याला विजेचा जोरदार झटका बसला. घटनेनंतर सोबत असलेल्या कामगारांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विनायकला मृत घोषित केले. 

Wasmat News : खराब रस्त्यावर विद्यार्थ्यांचे अपघात; चक्क शिक्षकाने खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर मागितली भीक

ठेकेदारासह अभियंत्यांवर गुन्हा दाखल 

ठेकेदार सुभाष त्रिभुवन आणि अभियंता निखिल नागदेव यांनी लिफ्ट बंद झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था केली पाहिजे होती आणि खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही, निष्काळजीपणाने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान विनायकचे वडील नानू याने २८ ऑगस्टला अमळनेर पोलिस ठाण्यात ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध भारतीय मुलाच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.