गौराईच्या सजावटीची घरोघरी लगबग
तयार मूर्तींना मागणी; बाजारात मुखवटे, दागिने उपलब्ध
महाड, ता. ३० (बातमीदार) : गणेशोत्सवामध्ये गौरी सणाला मोठे महत्त्व असते. यंदा ज्येष्ठा नक्षत्रावर १ सप्टेंबरला गौरीपूजन होणार असल्याने ३१ ऑगस्टला गौरींचे घरोघरी आगमन होणार असल्याने घरोघरी सजावटीच्या तयारीला वेग आला आहे.
काही वर्षांपासून तयार मूर्ती, सालंकृत गौरी मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असतो. दुकानांमध्ये तयार मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. गौरीमूर्ती साधारणतः तीन ते चार फुटांची आहेत. त्यांची किंमत चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असते. याशिवाय गौरींचे लहान, मोठ्या आकारातील मुखवटे गर्दी होत आहे. गौरीचे मुखवटे कोल्हापूर, अमरावती येथून आणले जातात. खळी मुखवटा, हसरा मुखवटा, अमरावती मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवटा आणि एकवीरा मुखवट्यांना विशेष मागणी आहे. लाकूड, फायबर, पीओपी, प्लॅस्टिकपासून तयार केले जातात. याशिवाय गौरीसाठी आवश्यक असणारे मुकुट, बांगड्या, कंठहार, दागिने, हिरव्या रंगाच्या साड्यांची खरेदी केली जात आहे.
-----------------------------------------
गौराईसाठी ‘महाराणी’ साडीला पंसती आहे. गौराईच्या उंचीनुसार साड्या मिळतात. गौराईला सजवण्यासाठी विविध प्रकारचे दागिने आहेत. याचबरोबर ठुशी, लक्ष्मीहार, पोत्याची माळ, रत्नजडित मंगळसूत्र, कोल्हापुरी हार, बोरमाळ, तोडे, नथ असे दागिने वापरले जातात. या वेळी बाजारात गौरी तयार करण्यासाठी लागणारे स्टँड, मुखवटा, पाऊलजोड, दिव्यांच्या माळा उपलब्ध आहेत.
-------------------------------
प्रकार किंमत
तयार उभी गौरी - ४,५००-५,०००
गौराई स्टॅन्ड - ५०० ते ७००
साडी - ५०० पासून पुढे
दागिने - १०० ते ५,०००
फायबर गौरी - दोन ते अडीच हजार
़़़़़़़़़ः---------------------------
उभ्या गौरी तसेच गौरीचे विविध मुखवटे उपलब्ध आहेत. कोल्हापूर, अमरावती मुखवट्यांना अधिक मागणी आहे.
- आर. एम. चव्हाण, व्यापारी