सलमान खानच्या फार्महाऊसवर यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब सहभागी झालं.
बाप्पाच्या आगमन व विसर्जनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले; विसर्जनावेळी खान कुटुंबाने आरतीसोबत डान्सही केला.
सलीम खान यांनी सांगितलं की गणेशोत्सवाची परंपरा त्यांच्या कुटुंबात वडिलांच्या काळापासून आहे, तसेच त्यांच्या घरी गोमांस खाल्लं जात नाही.
Bollywood News : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात थाटात साजरा होतोय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालं. अभिनेता सलमान खानच्या फार्महाऊसवरही दरवर्षीप्रमाणे यंदा गणपती बाप्पाचं आगमन थाटात झालं. सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
या गणेशोत्सवात संपूर्ण खान कुटूंब उत्साहाने सहभागी झालं होतं. विसर्जनाच्या वेळी सलमानने सहकुटूंब आरती केली. तर विसर्जनाला सर्व खान कुटूंबाने एकत्र डान्सही केला. नुकतीच सलीम खान यांनी फ्री प्रेस जर्नलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील गणेशोत्सवावर भाष्य केलं.
ते म्हणाले की,"आम्ही संपूर्ण खान कुटूंब होळी, दसरा, ईद, दिवाळी, ख्रिसमस हे सगळे सण सारख्याच उत्साहाने साजरे करतो. गणपती उत्सवाची परंपरा आमच्याकडे माझ्या वडिलांपासून चालत आली आहे."
"इंदोरमध्ये असल्यापासून ते आतापर्यंत आमच्याकडे गोमांस खाल्लं जात नाही. बरेच मुस्लिम लोक गोमांस खातात कारण ते स्वस्त आहे. काहीजण त्यांच्या कुत्र्यांना खाण्यासाठी विकत घेतात. पण पैंगंबर मोहोम्मदच्या शिकवणीमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की गायीचं दूध हे आईच्या दुधासाठी उत्तम पर्याय आहे. ती खूप उपयुक्त वस्तू आहे."
"गायींची हत्या करणं आणि गोमांस विकण्यावर बंदी आणली पाहिजे. मोहोम्मद पैगंबरांनी प्रत्येक धर्मातून चांगल्या गोष्टी घेतलाय. जसं की फक्त हलाल केलेलं मांस सेवन करणं ही ज्यू धर्मची शिकवण आहे जे त्याला कोशर म्हणतात. ते म्हणतात की प्रत्येक धर्म चांगला आहे आणि आपण मानत असलेल्या सर्वोच्च शक्तीवर ते सुद्धा विश्वास ठेवतात" असंही त्यांनी म्हटलं.
View this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
सलीम खान यांची ही मुलाखत चर्चेत असून अनेकांनी त्यांच्या संस्कारांचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर ही मुलाखत व्हायरल झालीये.
FAQs :Q1. सलमान खानच्या घरी गणेशोत्सव कसा साजरा झाला?
➡️ थाटामाटात बाप्पाचं आगमन करून आरती आणि विसर्जन सोहळ्यात संपूर्ण खान कुटुंब सहभागी झालं.
Q2. विसर्जनावेळी काय विशेष घडलं?
➡️ खान कुटुंबाने एकत्र आरती केली आणि सर्वांनी डान्स करून बाप्पाला निरोप दिला.
Q3. गणेशोत्सवाची परंपरा खान कुटुंबात कधीपासून आहे?
➡️ सलीम खान यांच्या वडिलांच्या काळापासून ही परंपरा सुरू आहे.
Q4. सलीम खान यांनी गोमांस खाण्यावर काय भाष्य केलं?
➡️ त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरात गोमांस खाल्लं जात नाही आणि पैगंबर मोहम्मद यांनी गायीचं दूध उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.
Q5. खान कुटुंब इतर कोणते सण साजरे करतात?
➡️ होळी, दसरा, ईद, दिवाळी आणि ख्रिसमससह सर्व सण ते सारख्याच उत्साहाने साजरे करतात.