धम्म क्रांती कला मंचाची
तालुका कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी, ता. १ ः तालुक्यातील धम्मक्रांती कला मंच यांची रत्नागिरी तालुका कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी मालगुंड येथील रविकांत सोनू पवार यांची आणि सचिवपदी निवेंडी येथील सतिश भागुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणी अशी मिलिंद महादेव कांबळे (कार्याध्यक्ष), प्रशांत श्रीधर मोहिते (उपकार्याध्यक्ष), अनंत गंगाराम जाधव (उपाध्यक्ष), सुरेश गंगाराम कांबळे (पानवळ), प्रशांत गोपिनाथ जाधव, संदीप सोनू जाधव, उमेश नामदेव मोहिते (उपचिटणीस), गौतम सावंत (खजिनदार) यांची निवड झाली आहे. जाकादेवी हायस्कूल येथे आयोजित धम्मक्रांती कला मंच सविचार सभेला मनोज जाधव, युयुत्सु आर्ते, शाहीर जनार्दन मोहिते, प्रकाश पवार, रविकांत सोनू पवार यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.
---