१९ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकाची रेकॉर्ड ब्रेकींग फटकेबाजी; आंद्रे रसेलच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी
esakal September 02, 2025 10:45 AM
  • न्यूझीलंडचा टीम सेईफर्टने CPL 2025 मध्ये ४० चेंडूंत शतक झळकावत आंद्रे रसेलच्या विक्रमाशी बरोबरी केली.

  • सेईफर्ट ५३ चेंडूत १२५ नाबाद धावा ठोकून सेंट ल्युसिया किंग्सला १७.५ षटकांत विजय मिळवून दिला.

  • त्याच्या डावात १० चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता; फक्त १९ चेंडूत १०४ धावा चौकार-षटकारांतूनच आल्या.

CPL 2025 St Lucia Kings vs Antigua Falcons Tim Seifert hundred : न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टीम सेईफर्टने कॅरिबियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ३० वर्षीय फलंदाजाने ४० चेंडूंत शतक पूर्ण करून CPL च्या इतिहासातील सर्वात जलद शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. सेंट ल्युसिया किंग्स आणि अँटिग्वा अँड बर्बुडा फॅलकोन्स यांच्यातल्या सामन्यात हा वादळी खेळ पाहायला मिळाला.

सेइफर्ट ५३ चेंडूंत १२५ धावांवर नाबाद राहिला आणि त्याच्या या खेळीच्या जोरावर किंग्सने १७.५ षटकांत २०५ धावांचे लक्ष्य ६ विकेट्स राखून सहज पार केले. त्याच्याशिवाय जॉन्सन चार्ल्स ( १७), एकीम ऑगस्टे ( १९), रोस्टन चेस ( ११) व टीम डेव्हिड ( २३) यांनी छोटेखानी खेळी केली.

India Fitness Test Results: शुभमन गिल, जसप्रीत बुमराह यांनी पास केली फिटनेस टेस्ट; रोहित शर्मा...

त्याआधी आमीर जंगूने ४३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५६, तर शाकिब अल हसनने २६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. फॅबिएन अॅलन १७ चेंडूंत ३८ धावांवर नाबाद राहिला आणि फॅलकॉन संघाला ४ बाद २०४ धावांपर्यंत घेऊन गेला.

सेईफर्टने ४० चेंडूंत शतक पूर्ण केले आणि CPLमधील हे संयुक्त वेगवान शतक ठरले. २०१८ मध्ये आंद्रे रसेलने जमैका थलाव्हाजकडून खेळताना त्रिनबागो नाइट रायडर्सविरुद्ध ४० चेंडूंत शतक पूर्ण केले होते. २०२३ मध्ये शे होपने अॅमेझॉन संघाकडून ४१ चेंडूंत रॉयल्सविरुद्ध शतक झळकावले होते.

Sarfaraz Khan: आधीच टीम इंडियातून बाहेर झालेल्या सर्फराजच्या अडचणी वाढल्या, आता 'या' स्पर्धेतूनही झाला संघाबाहेर

सेइफर्टच्या नाबाद १२५ धावांच्या खेळीत १० चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली. त्याने १९ चेंडूंत चौकार-षटकारांनीच १०४ धावा चोपल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजाची CPL मधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी कॉलिन मुन्रोने १७ ऑगस्ट २०२५ मध्ये १२० धावांची खेळी केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.