29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सामाजिक पद यात्रा काढण्यात येणार आहे. दीक्षाभूमी ते सेवाग्राम पद यात्रा काढण्यात येणार आहे. मुख्य पदयात्रा देशभरातील 75 लोक करणार असून, इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केलं जाणार आहे. 2 ऑक्टोबरला दसरा आहे, संघ यावर्षी मोठ्या प्रमाणात तो साजरा करणार आहे. संविधान आणि लोकतंत्र वाचविण्यासाठी आणि नफरत कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
Delhi Rain : दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस; दिल्ली-गुरुग्राम सीमेवर मोठी वाहतूक कोंडीदिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांची गती मंदावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, मराठा आंदोलकांची सीएसटीएम आणि मुंबई महापालिका मुख्य कार्यालय आणि एकूण फोर्ट परिसरात लावण्यात आलेली विविध वाहने रात्री उशिरा काढून ती जवळ असलेल्या विविध मैदानांवर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही वाहने काढण्यासाठी मराठा आंदोलकांकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil : मी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही – मनोज जरांगे पाटीलमी मेलो तरी चालेल, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यातच आज पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.
OBC Community : बारामतीत ओबीसी समाजबांधवांचा शुक्रवारी मोर्चा; मनोज जरांगे यांच्यावर कारवाईची मागणीबारामती : धनगर समाजाबद्दल अनुदगार काढल्याने मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात कारवाई न झाल्यास येत्या शुक्रवारी (ता. 5) बारामतीत ओबीसी समाजबांधव विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती नवनाथ पडळकर, बापूराव सोलनकर, पांडुरंग मेरगळ, चंद्रकांत वाघमोडे, संपत टकले, पोपट धवडे, देवेंद्र बनकर, महादेव कोकरे यांनी बारामतीत दिली.
Dr. Manju Sharma : कवी कुमार विश्वास यांच्या पत्नी डॉ. मंजू शर्मा यांनी आरपीएससी सदस्यपदाचा दिला राजीनामाराजस्थान लोकसेवा आयोगाच्या (RPSC) सदस्या डॉ. मंजू शर्मा यांनी एसआय भरती-२०२१ पेपर लीक प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पणीनंतर राजीनामा दिला. डॉ. मंजू शर्मा या प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते डॉ. कुमार विश्वास यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पाठवला आहे.
Chhagan Bhujbal : 'जर ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरू'; भुजबळ यांचा इशारामुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 'जर ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरू.'
Azad Maidan Andolan : आझाद मैदानातून आंदोलकांकडून स्वतःच वाहनं हटवण्यास सुरुवातआझाद मैदानातून आंदोलकांनी स्वतःच आपली वाहनं हटवण्यास सुरुवात केली आहे. स्पीकर वरून तासाभरात रस्ते मोकळे करण्याची सूचना केली जातं आहे. क्रॉस मैदान आणि आसपास आणखी दोनेक ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे.
Manoj Jarange Patil : नियमांचं पालन करा; जरांगे पाटलांचं आंदोलकांना आवाहनहायकोर्टात झालेल्या सुनावणीत मराठा आंदोलनात अटी आणि शर्थींचं उल्लंघन झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.
Mumbai Live News : गेट वे परिसरात प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडागेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Nashik Live: नाशिकमध्ये १ लाख ७० हजार किंमतीच्या पैठणी चोरीनाशिक येवला शहरातील बुरुड गल्लीत असलेल्या सुरेखा पैठणी दुकानात दोन महिलांनी पैठणी खरेदीसाठी येऊन दुकानदाराची नजर चकवून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीची महागडी पैठणी आपल्या साडीत लपवून चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Mumbai Live : "आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न" - मनोज जरांगे यांच्या वकिलांचा दावाघुसखोरांच्या काही वाईट गोष्टी कोर्टात दाखवण्यात आला. दादांनी कोर्टाच्या नियमाचं पालन करायला सांगितलं आहे. न्याय आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यास सांगितलं आहे. आम्ही त्या पाळल्या आणि समाजकंटक आंदोलनात घुसले आहेत. आंदोलन भरकटवण्याचा हा डाव आहे. 5 हजार लोकांनाच थांबायला सांगितलं आहे त्यावर जरांगे बोलतील.
Mumbai Live : जरांगे आंदोलनाविरोधात कोर्टाची सुनावणी होणार उद्यामनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधातील सुनावणी हायकोर्टाने उद्यावर ढकलली आहे. उद्या संध्याकाळी 3 वाजता सुनावणी होणार आहे.
Mumbai Live : बेस्ट बस मध्ये प्रवाशांची तुफान मारामारीबेस्ट बस मध्ये मारामारी
मुंबईच्या बेस्ट बस मध्ये प्रवाशांची तुफान मारामारी
व्हिडिओ वायरल
व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत नेमकी माहिती नाही
गळ्यात भगवे गमचे घातलेले तरुण आणि इतर प्रवाशी यांच्यात तुफान मारामार
मारामारीत बेस्ट बस ची काच फुटून झाले नुकसान
Mumbai Live Update: मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणीआझाद मैदानात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज कोर्टात युक्तीवाद झाला. उद्या मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.
Mumbai Live Updates: हायकोर्ट- जरांगेंचं आंदोलन हाताबाहेर गेलं- कोर्टाचं निरीक्षणआंदोलकांवर जरांगेंचा कंट्रोल नाही
आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचं पालन व्हावं
आम्हाला जरांगेंच्या प्रकृतीची काळजी
लोकांना मूलभूत गरजा मिळायला हव्यात
शाळा, कॉलेज, नोकरदारांना उगाच त्रास होऊ नये
मुंबईकरांसह मुंबईत येणाऱ्या कुणालाही त्रास व्हायला नको
- कोर्ट
Mumbai Live Upates: चाफेकर बंदू चौकात आंदोलकांचा हालगीच्या तालावर डान्समराठा आंदोलक मुंबईतील चाफेकर बंदू चौकात बसले आहेत
पोलिसांकडून आंदोलकांना उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे
मात्र मराठा आ़दोलक उठण्यास तयार नाहीत
गाणे आणि हालगीच्या तालावर नाचत आहेत
Maratha Reservation Live Updates : मुख्यमंत्री मराठी नाहीत म्हणून हे आंदोलन घडवून आणल जातंय : सदावर्तेमुख्यमंत्री मराठी नाहीत म्हणून हे आंदोलन घडवून आणल जातंय, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले
Maratha Reservation Live Updates: हे टाळता आलं असत, पण सरकारने ते केल नाही : विरोधी पक्ष वकीलहे टाळता आलं असत, पण सरकारने ते केल नाही : विरोधी पक्ष वकील
लोकांचे जनजीवन विस्कळीत होता कामा नये : कोर्ट
Maratha Reservation Live Updates: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणीसीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी
सीएसएमटी स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी सुरू
रुद्रा नावाच्या श्वानाकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी
Maratha Reservation Live Updates: शनिवार, रविवारचं आंदोलन परवानगीविना, सरकारची माहितीजरांगेंचे आंदोलन परवानगीविना करण्यात आली अशी माहिती सरकारने दिली आहे.
Maratha Reservation Live Updates: जरांगेंच्या आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींची पडताळणी सुरूजरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली असून आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींची पडताळणी सुरू केली आहे.
Maratha Reservation Live Updates: जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणीजरांगेंच्या आंदोलनाविरोधात थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे.
Maratha Reservation Live Updates: आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्यात पण सरकार त्यावर सध्या कारवाई करणार नाही - पंकज भोयर, गृहराज्यमंत्री- मुंबईच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्यात पण सरकार त्यावर सध्या कारवाई करणार नाही
- ते देखील आपलेच बांधव आहेत, सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.
- आंदोलकांशी चर्चा सुरू आहे पण सध्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नाही.
- मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून साखळी उपोषणस्थळी भेट दिली
- सरकार म्हणून आंदोलकांना आश्वस्त करतो की सरकार ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही.
Kolhapur Live Updates: कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने MC Donald's समोर निदर्शनेअमेरिकेने भारतीय मालावर 50% कर लावल्यानंतर कोल्हापुरात याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने MC Donald's समोर निदर्शने करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय कंपन्यांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन देखील या आंदोलनाच्या माध्यमातून केलं आहे. अमेरिकेने लादलेल्या करामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या वस्तूंवर देखील बहिष्कार घाला असा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Supriya Sule Live Updates: जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी जी धोरणे राबवली ती आजचे सरकार राबवत आहे - खासदार सुप्रिया सुळेपंतप्रधान मोदींच्या एससीओ शिखर परिषदेत सहभागाबद्दल राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "रशिया, चीन आणि भारत अनेक धोरणांवर एकत्र काम करत होते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी जी धोरणे राबवली ती आजचे सरकार राबवत आहे."
Maratha Reservation Live Updates: अशा प्रकारे आंदोलन केल्यास समाजाची बदनामी होऊ शकते - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी जरांगे पाटलांनी आंदोलकांना समजविण्याचा सल्ला दिला. आझाद मैदानावर मराठा बांधव एकत्र येण्यात गैर नाही, परंतु इतर ठिकाणी दैनंदिन जीवन विस्कळीत होईल अशा प्रकारे आंदोलन केल्यास समाजाची बदनामी होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
Maratha Quota Row Live Updates: मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याला आमचा विरोध कायम - डॉ बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ- मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीपासून यू टर्न घेत असल्याचा तायवाडे यांचा आरोप
- सुरुवातीला सरसकट मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणारे जरांगे आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद त्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहे
- मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली, त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार कमी झाली
- मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याला आमचा विरोध कायम
- गॅझेटमध्ये नोंद असलेल्या, शैक्षणिक, महसूल कागदावर नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही
- छगन भुजबळ यांनी बोलविलेल्या बैठकीला जाणे शक्य नाही, त्यांना फोन वरून या बाबत कल्पना दिली
Nashik Live Updates: शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फुंकणार रणशिंग- शरद पवारांच्या नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फुंकणार रणशिंग
- १४ आणि १५ सप्टेंबर दोन दिवस शरद पवारांचा नाशिक जिल्हा दौरा
- १४ सप्टेंबरला दिंडोरी येथे कार्यकर्त्यांचे शिबिर
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार
- १५ सप्टेंबरला नाशिक शहरात भव्य शेतकरी मोर्चा
- कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा या मागण्यांवर उठवणार आवाज
- दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार
Pune Live : खासदार सुप्रिया सुळे कसबा गणपती दर्शनालाखासदार सुप्रिया सुळे आज कसबा गणपती दर्शनाला गेल्या आहेत
पुण्यातील मानाच्या गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन
सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर
mumbai Live : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये मराठा बांधवांची गर्दी
आजचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे
मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात
Mumbai Live : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जे जे रुग्णालयाचे डॉक्टर दाखलमनोज जरांगे पाटील यांच्या तब्येत बिघडली असल्यामुळे मुंबईतील जे जे हॉस्पिटलचे डॉक्टर दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी पाणी प्यावं असं सल्ला दिलेला आहे. आजपासून जरांगे पाटील पाणी सोडणार आहेत, आजचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे.
Mumbai Live : वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडीसायन - पनवेल हायवेवर वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.Maharashtra Live : आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासलेनामफलकावर 'पूर्व नागपूर' लिहिण्याचा वाद,काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले
- भाजप कार्यकर्त्यांनी काळ फसल्याचा आरोप
- अभिजित वंजारी यांचे सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील आंबेडकर चौकात जनसंपर्क कार्यालय आहे..
- अभिजीत वंजारी हे विधान परिषद सदस्य आहेत, असे असताना, त्यांनी कार्यालयाच्या फलकावर 'आमदार अभिजीत वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र' असे लिहिले आहे...
- वंजारी हे स्वतःला पूर्व नागपूरचे आमदार असल्याचे दाखवत असून हे नियमांची पायमल्ली असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला होता....
- यानंतर आमदार वंजारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील नामफलकाला काळे फासण्यात आले
- काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली...
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस झाला आहे. या आंदोलनात पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी वेळ वाया न घालवता हे विद्यार्थी आपल्या अभ्यासालाच प्राधान्य देत आहेत. आंदोलन चालू असतानाही पुस्तकं आणि नोट्स हातात घेऊन अभ्यास सुरू ठेवणारे हे तरुण आंदोलनाची जाणीव आणि अभ्यासाची जबाबदारी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी निभावताना दिसत आहेत.
Live Breaking News Updates In Marathi: आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या सहा टीम मुंबईत दाखलमुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून डॉक्टरांच्या सहा टीम मुंबईत दाखल झाल्या आहेत. या टीममध्ये सर्व जाती-धर्माचे डॉक्टर्स सामील असून आंदोलन परिसरात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे अनेकांना व्हायरल ताप, त्वचारोग, अंगदुखी आणि इतर आजार जडले आहेत. पायाला चिखल्या लागणे किंवा ओली कपडे वापरणे यामुळे त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या टीमकडून आंदोलनकर्त्यांना मोफत औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
डॉकयार्ड परिसरात मराठा आंदोलकांची अंघोळमुंबईत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला अनोखा वळण मिळालं आहे. डॉकयार्ड परिसरात आज मोठ्या संख्येने जमलेल्या मराठा आंदोलकांनी प्रतीकात्मक पद्धतीने सामूहिक अंघोळ केली. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही वेगळी पद्धत वापरत आंदोलकांनी आपला रोष आणि निर्धार व्यक्त केला. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.
Live Breaking News Updates In Marathi: नागपूर : ओबीसी महासंघाचं आंदोलन आणि भुजबळ यांच्याशी चर्चानागपूरात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची फोनवरून चर्चा झाली. आज मुंबईत आंदोलनासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र नागपूरातील उपोषण लक्षात घेता डॉ. तायवाडे स्वतः बैठकीला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या बैठकीतून निघणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Live Breaking News Updates In Marathi: अंतरवालीत ओबीसी आंदोलकांचं उपोषण, सकाळी १० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवातअंतरवाली येथे ओबीसी समाजाचे आंदोलक आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्याप या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आंदोलक आणि प्रशासन यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे.
Manoj Jarange Live: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस: आरक्षणाच्या मागणीसाठी लढा अधिक तीव्रमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आमरण उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असतानाही ते आपला निर्धार सोडायला तयार नाहीत. आझाद मैदानावर जमलेल्या हजारो समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे वातावरण भारावून गेलं आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असून समित्यांच्या बैठकींना वेग आला आहे. मात्र जरांगे यांनी तातडीने ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा उफाळलं असून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतल्या पावसामुळे वाहतुकीचं नियोजन बिघडलंय, तर आझाद मैदानावर हजारोंचा जनसमुदाय जमला आहे. दुसरीकडे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय हालचाली चर्चेत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयांवरून विरोधकांचा हल्ला सुरू आहे, तर राहुल गांधींच्या दौऱ्याचीही जोरदार चर्चा आहे. क्रीडा क्षेत्रात आशिया कप 2025 आणि भारताच्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागलंय. याचबरोबर सोन्या–चांदीचे भाव, पेट्रोल-डिझेल दर, हवामान अंदाज, बॉलिवूड अपडेट्स आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओंनी लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.