देखाव्यांऐवजी पर्यावरणपूरक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर
esakal September 02, 2025 11:45 AM

मोशी, ता.१ : मोशी, मोशी प्राधिकरण, बोराटे वस्ती, बारणे वस्ती, डुडुळगाव आदी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्यावतीने सजावट अथवा देखाव्यांऐवजी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना तसेच पर्यावरणपूरक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला आहे. गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तेथेही गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम
मोशीतील मोशी - देहू रस्त्यावरील बारणे वस्ती येथील शिवशंभो प्रतिष्ठान या मंडळाने आकर्षक गणेश मूर्तीची स्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक संतोष बारणे, उपाध्यक्ष शिवाजी बारणे; तर सचिव सचिन बारणे आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मोशी प्राधिकरण येथील संतनगर आणि भूगोल फाउंडेशन मित्र मंडळाच्यावतीने हनुमान मंदिर प्रांगणामध्ये पर्यावरणपूरक देखावा सादर केला आहे. त्याद्वारे वृक्षारोपण, वृक्ष दान आणि वृक्ष संगोपनाबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज आहेत.

शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम
मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहा मधील आमराई चॅरिटेबल ट्रस्टने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रांतील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

नऊदेवींच्या प्रतिमा
पुणे - नाशिक महामार्गावरील वाघजाई गणेश मित्र मंडळाच्यावतीने नऊ देवींच्या प्रतिमांची आकर्षक सजावट केली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. भालचंद्र बोराटे हे अध्यक्ष तर गणेश बोराटे उपाध्यक्ष आहेत.

फुलांची आकर्षक सजावट
पुणे - नाशिक महामार्गालगतच्या आल्हाट वस्ती येथील नवचैतन्य मित्र मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली आहे. प्रशांत आल्हाट हे अध्यक्ष आहेत.

सामाजिक कार्यक्रम
नागेश्वर महाराज मंदिर चौक येथील अमरवीर ज्योती तरुण मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना केली असून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धनंजय आल्हाट हे अध्यक्ष आहेत.

एलईडी स्क्रीनवर समाजप्रबोधन
मोशी - देहू, जाधववाडी लिंक रस्त्यावरील लक्ष्मी चौकातील चैतन्य मित्र मंडळाने एलईडी स्क्रीनवर शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आदी विविध विषयांवर देखावे, संदेशाद्वारे समाज प्रबोधन केले आहे. गणेश बोराटे हे अध्यक्ष असून मच्छिंद्र बोराटे उपाध्यक्ष आहेत.

धार्मिक कार्यक्रम
डुडुळगाव येथील अडबंगनाथ गणेश मित्र मंडळाच्यावतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.