अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेड एडवायजर पीटर नवारो सध्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नवारो यांनी 28 ऑगस्ट रोजी रशिया-युक्रेन संघर्षाला मोदी युद्ध म्हटलं होतं. नवारोंनी आरोप केलेला की, रशियाकडून तेल खरेदी करुन भारत या युद्धाला हवा देत आहे. 29 ऑगस्टला म्हणाले की, भारतावर टॅरिफ लावून पुतिन यांच्या वॉर मशीनला मिळणारी आर्थिक मदत रोखली.
नवारो इतक्यावरच थांबले नाहीत, 31 ऑगस्ट रोजी ते म्हणाले की, भारत क्रेमलिनसाठी मनी लॉन्ड्रिंगच्या मशीन शिवाय काही नाही. तुम्ही पाहिलं असेल, ब्राह्मण भारतीय लोकांच्या खर्चावर फायदा कमवत आहेत. आता नवारो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी,चीनआणि रशियन राष्ट्रपतींच्या एकत्र भेटीवर आक्षेप आहे. ट्रम्प यांचे निष्ठावान हे नवारो कोण आहेत? जाणून घ्या.
कधीपासून व्यापार सल्लागार?
पीटर केंट नवारो यांचा जन्म 15 जुलै 1949 रोजी मैसाचुसेट्सच्या केम्ब्रिज येथे झाला. ते अमेरिकी अर्थशास्त्री आहेत. जनवरी 2025 पासून ते ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार आहेत. 2016 साली ट्रम्प यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये ते सोबत होते.
आई-वडिलांचा घटस्फोट
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात व्हाइट हाउसमध्ये ते नॅशनल ट्रेड काऊन्सिल डायरेक्टर पदावर होते. नवारो यांचे वडील अल्बर्ट अल नवारो पेशाने संगीतकार होते. त्यांची आई एवलिन लिटिलजॉन, सॅक्स फिफ्थ एवेन्यूमध्ये सेक्रेटरी होती. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर नवारो आणि त्यांचा भाऊ आईसोबत मेरीलँड बेथेस्डा येथे एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहू लागला.
यूनिवर्सिटीमधून स्कॉलरशिप
नवारो यांना मॅसाचुसेट्स स्थित टफ्ट्स यूनिवर्सिटीमधून स्कॉलरशिप मिळाली. त्यांनी 1972 मध्ये ग्रॅजुएशन केलं. टफ्ट्समधून ग्रॅजुएशन केल्यानंतर नवारो अमेरिकी शांती सैन्यात सहभागी झाले. 1973 ते 1976 पर्यंत तीन वर्ष थायलंडमध्ये सर्विस केली. या दरम्यान लाओस, दक्षिण कोरिया, जापान, भारत, म्यानमार आणि मलेशियाचा दौरा केला.
एडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर्सची पदवी
पीस कॉर्प्समध्ये सर्विस दिल्यानंतर नवारो यांनी हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. 1979 मध्ये जॉन एफ. केनेडी स्कूलमधून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर हार्वर्डमधून अर्थशास्त्रात पीएचडीच शिक्षण घेतलं. 1986 साली अर्थशास्त्री रिचर्ड ई. केव्स के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली.
पब्लिक पॉलिसीचे प्रोफेसर
नवारो 1989 साली कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीच्या पॉल मेरेज स्कूल ऑफ बिजनेस इकोनॉमिक्स आणि पब्लिक पॉलिसीचे प्रोफेसर बनले. दोन दशकापेक्षा अधिक काळ नवारो यांनी शिक्षकाच काम केलं. इकोनॉमिक्स आणि पब्लिक पॉलिसीशी संबंधित सिलेबससाठी नवारो यांनी अनेक एकेडमिक सुद्धा मिळाले.
अनेक पुस्तकं लिहिली
त्यांनी ऊर्जा नीती, व्यापार, विनियमन-मुक्ती आणि कॉर्पोरेट व्यवहार या विषयांवर रिसर्च केला. सोबतच अनेक पुस्तकं लिहिली. त्यांनी एक अर्थशास्त्री, लेखक आणि अमेरिकी व्यापार रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं.
चीनवर पुस्तक लिहिलं
नवारो यांनी 2006 साली चीनवर एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच नाव होतं, द कमिंग चायना वॉर्स. यात चीनच्या आर्थिक आणि सैन्य उदयामुळे जगासाठी काय धोके आहेत? त्या बद्दल लिहिलं आहे. यात अर्थव्यवस्थेपासून जलवायु परिवर्तनाचे मुद्दे देखील आहेत. नवारो यांनी पुस्तकात लिहिलय की, चीन हा देश व्यापारात दगा देतो.
चार महिन्यांची जेल
नवारो यांना अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात 2024 साली चार महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. काँग्रेसच्या अवमानना प्रकरणात जेलमध्ये जाणारे ते माजी व्हाइट हाऊस अधिकारी बनले.