योगेश काशीद
बीड : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी अंबाजोगाई येथील एका तरुणाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. या तरुणाने 'सायबर बंधू डॉट कॉम' नावाची एक वेबसाइट विकसित केली आहे. ज्याद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबरचा होणारा गैरवापर थांबवता येऊ शकतो.
आजच्या डिजिटल युगात अनेकांच्या आधार, पॅन किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर केला जातो. ज्यामुळे मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकते. अर्थात सायबर गुन्हेगार हे प्रकार सहजतेने करत असून याला आळा बसलेला नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाईयेथील सौरव बापूदेव कांबळे याने एक वेबसाईड तयार केली असून या आधारे अशा प्रकारांना आळा बसू शकतो असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
Nandurbar : धार्मिक कार्यक्रमात जेवणातून संपूर्ण गावाला विषबाधा; नंदुरबार तालुक्यातील घटनाबी टेकचे शिक्षण घेताना बनवीली वेबसाईड
अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरातील शिक्षक बापूदेव कांबळे यांचा मुलगा असलेल्या सौरवने ही वेबसाइट तयार केली आहे. सध्या तो एनआयटी कॉलेज जालंधर (पंजाब) येथे बी टेकचे शिक्षण घेत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागातील बर्दापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. बी टेकचे शिक्षण घेत असताना त्याने आपली आयडिया लढवत 'सायबर बंधू' वेबसाईट विकसित केली आहे.
Bhiwandi : गाडी पार्किंगवरून वाद; पोलिस हवालदाराला मारहाण, टोळक्याला अटक करत १ लाखांचा मुद्देमाल जप्तगैरवापराची माहिती घेता येणे शक्य
या वेबसाइटच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर कोणी, कधी आणि कशासाठी केला आहे; याची माहिती मिळवू शकतात. यामुळे आपल्या माहितीचा गैरवापर होत आहे का? हे वेळीच समजून घेणे शक्य होईल. सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे आणि स्तुत्य पाऊल मानले जात आहे. सौरवच्या या संशोधनामुळे अनेक नागरिकांची फसवणूक टाळता येऊ शकते.