Agriculture News : शेतकरी हवालदिल! कोबीला भाव मिळेना; उत्पादन खर्चही निघणे मुश्किल
esakal September 05, 2025 06:45 PM

खामखेडा: परिसरात कोबी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा जुलै,ऑगस्ट महिन्यात कोबीला २५ ते ३५ रुपये किलो भाव होता. दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडे कोबी नव्हती, त्यावेळेस कोबीला मोठ्या प्रमाणात भाव होता.आता शेतकऱ्यांकडे कोबीचे पीक तयार झाले आणि कोबीचे भाव अवघे चार-पाच रूपयावर येऊन ठेपले आहेत.

त्यामुळे कोबीच्या पिकातून उत्पादन खर्च देखील निघेल असा झाला आहे. कोबी व कांदा पिकाच्या क्षेत्र वाढ झाल्याने कांदा व कोबी पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. खामखेड़ा परिसरात गेल्या चार- पाच मोठ्या प्रमाणात कोबी या पिकांची लागवड केली जाते. गुजरात मघील सूरत, भरुच ,अहमदाबाद मार्केटमघ्ये कोबीसाठी खामखेड़ाचे नाव प्रसिद्ध आहे. गुजरात मधील काही व्यापारी कोबी खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. गावातील तरुणांना काम मिळते.

Water Supply Cut: ठाणे जिल्ह्यात ६ तास पाणी पुरवठा बंद, कधी आणि कुठे?

यंदा कोबीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरणा होऊन कोबीचे भाव पाच रूपयापर्यंत येऊन ठेपला आहेत.कोबी पिकाला दर तीन-चार दिवसातून फवारणी करावी लागते.या फवारणीचे औषधही महागडी असतात.एक एकर कोबीसाठी बियाणे,लागवड खर्च,फवारणीचा खर्च,यांचा सर्व विचार करता.एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चाचा विचार करता कोबीला निदान दहा ते पंधरा किलो रुपये बाजार भाव पाहिजे आसे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.