कुरुळी, ता. ५ ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चाकण शाखा यांच्या वतीने बँकेच्या १०८व्या वर्धापन दिनानिमित्त सभासद खातेदार, कर्जदार यांना रोपे वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या १०० वर्षांपूर्वीपासून पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज, विविध प्रकारचे कर्ज, व्यावसायिक अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. यावेळी बॅंकेकडून खातेदारांचा शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शाखा मुख्य व्यवस्थापक के. बोंबले, विकास अधिकारी आर मुळुक, उपव्यवस्थापक गीताराम राळे, व्ही. वाडेकर, राजेश काळे, दीपक खिपसे, तुषार सातकर, आशा खेडेकर, योगेश बवले, विविध कार्यकारी सोसायटी सचिव चंदन पानसरे, नीलेश देशमुख, अरुण घाडगे, दत्तात्रेय शिवेकर, सेवानिवृत्त अधिकारी बाबासाहेब सोनवणे, ज्ञानेश्वर भोसले, बाळासाहेब शिवेकर आदी उपस्थित होते.
02201