रविवारच्या निवांत सकाळी बटाटा आणि रव्याच्या पुऱ्या बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आणि चवदार आहे. अवघ्या १५-२० मिनिटांत तयार होणाऱ्या या पुऱ्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. चटणी, दही किंवा टोमॅटो सॉससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Quick potato semolina poori recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात चविष्ट आणि उत्साहपूर्ण करतो. रविवारच्या निवांत सकाळी काहीतरी खास आणि झटपट बनवण्याचा मूड असेल, तर बटाटा आणि रव्याची पुरी हा उत्तम पर्याय आहे. ही पुरी केवळ चवदारच नाही, तर बनवायलाही अत्यंत सोपी आणि कमी वेळेत तयार होणारी आहे. बटाट्याची मऊ चव आणि रव्याचा कुरकुरीतपणा यांचा संगम या पुऱ्यांना खास बनवतो. अवघ्या १५-२० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी व्यस्त सकाळी किंवा आळशी रविवारीदेखील सर्वांना आवडेल. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही पुरी चटणी, दही किंवा अगदी टोमॅटो सॉससोबत खायला मजा येते. चला तर मग जाणून घेऊया बटाटा अन् रव्यापासून स्वादिष्ट पुरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
रव्या बटाट्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्यबटाटा
रवा
तिखट
मीठ
कोथींबीर
तेल
गव्हाचे पीठ
ओवा
रव्या बटाट्याच्या पुऱ्या बनवण्याची कृतीसर्वात आधी एका भांड्यात रवा घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून चांगले मिसळा. नंतर उकळलेला बटाटा किसून घ्यावा. नंतर त्यात कोथिंबीर, मीठ, ओवा, लाल मिरची पावडर आणि रव्याची सारण मिसळा. नंतर त्यात गव्हाचे पीठ चांगले मिसळा.नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात सारणाच्या पुऱ्या लाटून तळून घ्याव्या. तुम्ही दही किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करू शकता.