स्टार प्रवाहवरील "तू हि रे माझा मितवा" ही मालिका प्रेक्षकांच्या मनात लोकप्रिय ठरली आहे.
मालिकेत सध्या अनेक नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून, कथा अधिक रोचक वळण घेत आहे.
पुढील भागात अर्णव एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे ज्यामुळे ईश्वरीचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे.
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील तू हि रे माझा मितवा ही लोकप्रिय मालिका. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अर्णव आता एक असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे ईश्वरीचं आयुष्य बदलणार आहे. मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार आहे जाणून घेऊया.
अर्णवसमोर राकेशचे खरे हेतू उघड झाले आहेत. तर राकेश अर्णवविषयी ईश्वराच्या मनात गैरसमज निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.
प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, अर्णव ईश्वरीला राकेशविषयी खरं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ती ऐकत नाही. तेव्हाच तिला चक्कर येते. अर्णव तिला राकेशने तुला काय दिलेलं असं विचारतो. तेव्हा तिला राकेशने चहामध्ये काहीतरी मिसळल्याचं आठवतं. तितक्यात पोलीस लॉजवर धाड टाकतात. ईश्वरीला वाचवण्यासाठी अर्णव तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि बाहेर येऊन ती माझी बायको असल्याचं जाहीर करतो.
View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)
मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षक खुश झाले आहेत. "आता त्यांचं खरं लग्न झाल्याचं लवकरात लवकर दाखवा","राकेशचं सत्य समोर आणा","मस्त मालिका" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
ईश्वरी आणि अर्णवच्या खोट्या लग्नाचं सत्य समजणार का ? राकेशचं खरं रूप अर्णव सगळ्यांसमोर कसं आणणार ? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा तू हि रे माझा मितवा सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
FAQs :
Q1. "तू हि रे माझा मितवा" ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित होते?
ही मालिका स्टार प्रवाह वर प्रसारित होते.
(On which channel is "Tu Hi Re Maza Mitwa" aired? – It is aired on Star Pravah.)
Q2. मालिकेत सध्या काय पाहायला मिळतंय?
मालिकेत अनेक नवे ट्विस्ट आणि बदल पाहायला मिळत आहेत.
(What is currently happening in the show? – Many new twists and changes are being shown.)
Q3. अर्णव कोणता निर्णय घेणार आहे?
अर्णव असा निर्णय घेणार आहे ज्यामुळे ईश्वरीचं आयुष्य बदलून जाईल.
(What decision is Arnav going to take? – A decision that will change Ishwari’s life completely.)
Q4. प्रेक्षकांची प्रतिक्रिया मालिकेबद्दल कशी आहे?
प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडत असून ती चर्चेत आहे.
(How are the viewers reacting to the show? – They like it a lot and it is much talked about.)
Q5. या मालिकेतील मुख्य पात्रं कोण आहेत?
मालिकेत मुख्य पात्रं आहेत अर्णव आणि ईश्वरी.
(Who are the lead characters in the show? – Arnav and Ishwari.)