Chanakya Niti : या तीन सवयी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, चाणक्य काय सांगतात?
Tv9 Marathi September 07, 2025 05:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजनितीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. ते त्यांच्या काळातील एक कुशल मार्गदर्शक होते. त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक त्यांच्याकडे येत होते. आजच्या युगात देखील आर्य चाणक्य यांचे विचार हे व्यक्तीला आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना प्रेरणा देतात.आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सवयी जर व्यक्तीला असतील तर असा व्यक्ती कंगाल होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

भविष्यासाठी धनाचा संचय न करणं – आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, व्यक्तीला नेहमी आपल्या कमाईचा काही भाग, आपल्या भविष्यासाठी वाचवला पाहिजे. ज्या लोकांना पैशांची बचत करण्याची सवय नसते, त्यांचं भविष्यात मोठं नुकसान होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा , तुमच्या संकट काळात फक्त तुम्ही बचत केलेला पैसाच तुमच्या उपयोगी पडणार आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना पैशांची बचत करण्याची सवय नसते अशा लोकांचं मोठं नुकसान होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कारण नसताना पैसे खर्च करणे – आर्य चाणक्य म्हणतात कारण नसताना पैसे खर्च करू नये, जिथे पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे, तिथे पैसे खर्च करावेत, मात्र तुम्ही जर पैशांची उधळपट्टी केली तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. जर तुम्ही गरज नसताना पैसा खर्च केला तर त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते.

दुसऱ्याची उधारी – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे पैसे नसतील तर इतरांकडून पैसे उधार घेऊन घरात एखादा उत्सव साजरा करू नका,असे केल्यास तुम्ही कर्जबाजारी व्हाल, तुम्ही संकटात सापडाल. माणसानं नेहमी अंथरून पाहूनच पाय पसरावेत असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.