छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. 'बिग बॉस मराठी ४' मध्ये त्या दोघांची भेट झाली होती. या शोमध्ये ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरात तशा अनेक जोड्या जुळतात. मात्र बाहेर आल्यानंतर त्या टिकत नाहीत. प्रसाद आणि अमृता याला अपवाद ठरले. त्यांनी बाहेर आल्यावर वर्षभरातच लग्नगाठ बांधली. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता विवाहबद्ध झाले. मात्र आता त्यांच्यासमोर एक मोठा पेच आहे. लग्न झालेलं असूनही ते दोघे वेगळे राहत आहेत. अमृताने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.
प्रसाद आणि अमृता चाहत्यांचेदेखील लाडके आहेत. लग्नानंतर काहीच महिन्यात प्रसादला 'पारु' ही झी मराठीवरील मालिका ऑफर झाली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत आहे. तर अमृताची संकर्षण कऱ्हाडेच्या 'नियम व अटी लागू' नाटकात एन्ट्री झाली. आपापल्या कामामुळे दोघांनाही एकमेकांना वेळ देता आला नाही. दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले. 'पारू' मालिकेच्या शूटसाठी प्रसादला साताऱ्याला शिफ्ट व्हावं लागलं. तर अमृता मुंबई आणि पुण्यात असते. नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यग्र असते. अशा परिस्थितीत दोघं एकमेकांना कसे वेळ देता. लग्नानंतरही वेगळं राहण्यावर त्यांचं मत काय या सगळ्यावर अमृताने भाष्य केलं आहे.
View this post on InstagramA post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)
अमृताने नुकतीच 'सर्वकाही' या पॉडकास्टला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, 'मी मुंबईत असते आणि प्रसाद साताऱ्याला असतो. आमचं आताच लग्न झालं आहे पण आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत. प्रसादचं तर ठाम मत असतं की मी वेगवेगळं राहण्यासाठी लग्न केलं का? मला लग्न केलं कारण मला एकत्र राहायचं होतं. एकत्र सहवास हवा होता. पण लग्नावर कमी खर्च केला असता तर आपण लगेच प्रोजेक्ट स्वीकारले नसते. ठिके, आता चांगली संधी मिळालीच आहे तर काय हरकत आहे. अशा संधी आपल्या क्षेत्रात फार क्वचित येते. भलेही तो प्रोजेक्ट घेतल्याने काही गोष्टी कम्फर्ट वाटणाऱ्या नसतील तरी ती भूमिका छान असते कधी चॅनल चांगलं असतं. या गोष्टींचा विचार करुन ते स्वीकारावं लागतं.'
अमृता म्हणाली, 'मग आम्ही जसा वेळ मिळतो तसं भेटतो. मला सुट्टी असली की मी साताऱ्याला जाते. प्रसादला सुट्टी मिळताच क्षणी मिळेल ती बस पकडून तो मुंबई किंवा पुण्याला येतो. दोघांनाही तेवढी ओढ आहे त्यामुळे लाँग डिस्टन्स तेवढं वाटत नाही.'
कोट्यावधींचा मालक असलेल्या अक्षय कुमारला मिळणार सासऱ्यांचीही प्रॉपर्टी; राजेश खन्नांनी ट्वींकलच्या नावे केलेली संपत्ती किती?