आज उपराष्ट्रपतींची निवडणूक होत आहे. मतदान सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल. त्यानंतर आजच उपराष्ट्रपती कोण याचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार निवडले आहे. तर भाजप आणि मित्र पक्षाने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा वाढला सस्पेन्स
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स वाढला आहे. आगे आगे देखो होता हैं क्या असे म्हणत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य केलं. खासदार फुटून क्रॉस वोटींग होणार का? या प्रश्नावर फडणवीसांनी असं मोठं विधान केलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांनी क्रॉस व्होटिंगचं स्वप्न पहात रहावं, असा टोलाही ही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्य सरकारने नमो महायोजना सुरु केली. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळतील. आपण तीन हफ्त्यामध्ये पैसे देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 वा हफ्ता दिला. आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हफ्ता देण्यात आला. आपण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केलेय. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. महासन्मान निधीचे पैसे आज आम्ही जमा केलेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हफ्ता वितरित झाला. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास ९१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे. १८९२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अंजली कृष्णाप्रकरणात रिपोर्ट मागवला
सोलापूरच्या महिला पोलीस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईची धमकी दिली होती. याप्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागितल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजितदादांनी सुद्धा याविषयात स्पष्टीकरण दिल्याचे ते म्हणाले.