नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तरुण आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरुन Gen Zनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. हे तरुण इतके आक्रम झाले आहेत की त्यांनी काही मंत्र्यांच्या घराला आग लावली तर काही मंत्र्यांच्या घराबाहेर गोळीबार केला आहे. या सर्वामुळे केपी शर्मा ओलींची खुर्ची आता हादरू लागली आहे. नेपाळ सरकारला Gen Z च्या ताकदीची जाणीव होऊ लागली आहे. सोशल मीडियावर बंदी तर उठवली गेली, पण Gen Z अजूनही मागे हटत नाहीत. ते आता थेट केपी शर्मा ओलींचे राजीनामे मागत आहेत. Gen Z च्या प्रदर्शनात तीन मंत्र्यांची खुर्ची गेली आहे. आता तर थेट केपी शर्मा ओलींची खुर्ची डगमगत आहे.
ओली सरकारला नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालणे महागात पडले आहे. सोमवारी नेपाळमध्ये युवकांच्या ताकदीने पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या सरकारला हादरवून टाकले आहे. Gen Z म्हणजे युवा पिढीचे प्रदर्शन खूप हिंसक झाले आहेत. यामुळे नेपालमध्ये खळबळ माजली आहे. Gen Z च्या या आक्रमकतेमुळे २० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३००हून अधिक लोक जखमी आहेत. सरकारने या तरुणांची ताकद पाहून शरणागती पत्करली आहे. मध्यरात्री सरकारने सोशल मीडियावर घातलेली बंदी हटवली आहे. तरीही हे तरुण मागे हटले नाहीत.
वाचा: मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला, तोच उतरविण्यासाठी…; लालबागच्या राजाच्या विसर्जनानंतर मच्छिमार कृती समितीचे पत्र
आता सोशल मीडिया बंदीपुरते बोलणे नाही
हे Gen Z इतके आक्रमक झाले आहेत की ते काही केल्या थांबेना झाले आहेत. आता हे सर्व फक्त सोशल मीडिया पुरता मर्यादित नाही असे त्यांनी म्हटले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या २० लोकांच्या मृत्यूनंतर आणखी संताप व्यक्त केला जात आहे. आता हे तरुण केपी शर्मा ओलींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याच कारणामुळे नेपाळमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. काठमांडूच्या रस्त्यांवर हजारो युवक उतरले आहेत. हे युवक आता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांविरुद्ध आवाज उठवत आहेत. आता आंदोलक हिंसक झाले आहेत. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरावर हल्ला केला आहे. गर्दीने या मंत्र्याच्या घराला आग लावली आहे.
देश सोडून ओली पळून जातील?
फक्त एवढेच नाही, माजी पंतप्रधानांच्या घरावरही हल्ला झाला आहे. केपी शर्मा ओलींवर सतत दबाव वाढत चालला आहे. याचदरम्यान बातमी आहे की केपी शर्मा ओली देश सोडून जाणार आहेत. सूत्रांनुसार, केपी शर्मा ओली दुबईला जाण्याची योजना आखत आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओलींच्या जवळच्या सूत्रांनुसार, ते उपचारांसाठी दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. या प्रवासासाठी एक खास विमान हिमालय एअरलाइन्सला स्टँडबायवर ठेवले गेले आहे. दुसरीकडे, नेपाळच्या तीन मंत्र्यांनी आत्तापर्यंत राजीनामे दिले आहेत. नेपाळचे गृह मंत्री, कृषी मंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी राजीनामा दिला आहे.