सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सेवा पंधरवडा राबविला जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनातर्फे जाहीर शासन निर्णयानुसार या कालावधीत प्रत्येक तालुक्यात किमान एक हजार प्रमाणपत्रे वाटप करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिपत्रकाद्वारे केली होती. या परिपत्रकाला मंत्री छगन भुजबळ यांनी चार दिवसांपूर्वी आक्षेप घेतला.
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुकछत्रपती संभाजीनगरमध्ये आज (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे- पाटीलयांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या पाठीशी राज्यातील मराठा समाज उभा करणार असल्याचेसांगितले. त्यामुळे सोलापूरच्या सेवा सप्ताहातील मराठा-कुणबी राज्यभर चर्चेत आला आहे.
जिल्हा प्रशासनाने सेवा सप्ताहाबाबत ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेले परिपत्रक घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खासगी वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात आक्षेप घेतला. मंत्री भुजबळ व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या परिपत्रकावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते.
सोलापूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र वाटप केले जाणार असल्याचा मुद्दा मंत्री भुजबळ यांनी उपस्थित केल्याने जिल्हा प्रशासनाने ५ सप्टेंबर रोजी सुधारित परिपत्रक काढले. या परिपत्रकात प्रत्येक तालुक्यात किमान हजार प्रमाणपत्र वाटप करण्याऐवजी कुणबी जातीच्या नोंदी शोधणे आणि विविध जातींची प्रलंबित प्रमाणपत्रे वाटप करणे, हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूरचा मुद्दा उपस्थित केला.
आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासासोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पूर्वी घेतलेल्या निर्णयावरच ठाम राहावे. त्यांच्या पाठीशी सोलापुरातील संपूर्ण मराठा समाज आणि वेळ पडली तर राज्यातील मराठा समाज उभा केला जाईल, अशी ग्वाही या पत्रकार परिषदेतून दिली.