मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?
Saam TV September 10, 2025 11:45 AM
  • मुंबईच्या कोलाबा परिसरात नेव्ही अग्निवीराची रायफल चोरी.

  • नेव्ही गणवेश घालून आलेल्या घुसखोराने फसवणूक करून रायफल पळवली.

  • नौदल, एटीएस आणि मुंबई पोलिस तपासात गुंतले.

  • शहरात हाय अलर्ट जाहीर, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.

मुंबईत ६ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारानं खळबळ उडाली आहे. कुलाबा परिसरात एका अज्ञात व्यक्तीनं नौदलाच्या अग्निवीराला फसवून त्याची रायफल आणि काडतूसे पळवली. अज्ञात व्यक्तीनं भारतीय नौदलाचा गणवेश घातला. नंतर चक्क रायफल आणि काडतुसे पळवली. या घटनेनंतर मुंबईत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्या एटीएस, नौदल आणि मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेव्हीचा गणवेश घालून आलेल्या अग्नीवीराला 'तुझी ड्युटी संपली', असं सांगून त्याच्या हातातील रायफल घेतली. अधिकाऱ्यांच्या गणवेशात असल्याकारणाने त्याला संशय आला नाही. मात्र, काही वेळातच तो रायफल घेऊन पसार झाला.

तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

प्रकरण उघडकीस आल्यानंतर तातडीने नौदल, एटीएस आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाल्य़ा. कफ परेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या ठिकाणी शोधमोहिम राबवण्यात आली आहे. परंतु, घुसखोराबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे तपास सुरू आहे.

नेत्याची भररस्त्यावर गोळ्या झाडून हत्या, कुटुंबाला वेगळाच संशय, हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप

या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठीनौदलाने स्वतंत्र समिती नेमली असून, घुसखोराकडे नौदलाचा गणवेश आलाच कसा? तो अज्ञात व्यक्ती अग्निवीरपर्यंत पोहोचला कसा? याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.