मुंबई : गणेशोत्सव संपताच अवैध बॅनर, पोस्टर आणि होर्डिंगवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, स्थानिक मंडळे आणि विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले होते. या बॅनरमुळे शहराचे सौंदर्याला बाधा तर येतेच, शिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
महानगरपालिकेनेप्रत्येक विभागात विशेष पथके तयार करून ही कारवाई सुरू केली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यरत असलेली ही पथके अवैध बॅनर आणि पोस्टर उतरवत आहेत. ज्या बॅनरला पूर्वपरवानगी मिळालेली नाही, ते थेट जप्त करून दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, अवैध जाहिरातींवर दंड आकारून आर्थिक तोटा भरून काढण्याबरोबरच शहरातील अनधिकृत जाहिरात माफियांना आळा घालणे हा उद्देश आहे.
Indian Railway: रेल्वेच्या जागांचा व्यावसायिक वापर; महालक्ष्मी, वांद्रे येथील जमिनी कोटी रुपयांच्या भाडेतत्त्वावरपालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बॅनरसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या नियमांकडे अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यावर्षी हजारो अवैध बॅनर लावले गेल्याची माहिती पालिकेकडे आली होती. परिणामी उत्सव संपताच स्वच्छ मुंबई मोहिमेंतर्गत या कारवाईला गती देण्यात आली आहे.
तक्रारी दाखल करानागरिकांनीही अवैध बॅनरबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन पालिकेकडूनकरण्यात आले आहे. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले. या मोहिमेमुळे पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पोस्टर हटवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्ववत स्वच्छ व मोकळी होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अमेरिकन नागरिकत्व मिळवणारा पहिला भारतीय कोण? वाचा 'या' कायदेशीर लढाईची कहाणी...