Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य, माझ्याविरोधात…
GH News September 11, 2025 06:19 PM

सोशल मीडियावर E20 फ्यूलवरुन होत असलेल्या टीकेवर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गडकरी म्हणाले की, “ही टीका कुठल्या टेक्निक्ल प्रॉब्लेममुळे नाही, तर श्रीमंत आणि शक्तीशाली पेट्रोल लॉबीने पसरवलेला प्रोपेगेंडा आहे” ते म्हणाले की,’माझ्याविरोधात एक पेड कॅम्पेन चालवलं जात आहे’. ई20 फ्यूल पेट्रोल आणि इथेनॉलच मिश्रण आहे. यात 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल असतं. सरकार याकडे ग्रीन एनर्जी ट्रांजिशनच्या दिशेमध्ये एक महत्वाच पाऊल मानते. पण सोशल मीडियावर काही युजर्सच म्हणणं आहे की, या कार्समध्ये मायलेज कमी असू शकतो. इंजिनवर परिणाम होऊ शकतो.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशनने (FADA) आयोजित केलेल्या ऑटो रिटेल कॉन्क्लेवमध्ये नितीन गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की, “प्रत्येक ठिकाणी लॉबी असते. तुमच्यामध्ये सुद्धा आहे. पण E20 फ्यूलवरुन सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, ते काम पेट्रोल लॉबीच आहे” ‘हे तंत्रज्ञान भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणार आहे. प्रदूषण कमी करायला मदत होईल’ असं गडकरी म्हणाले.

वाढवून-चढवून सांगितलं जातय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने हे आधीच स्पष्ट केलय की, ई20 फ्यूलमुळे मायलेजवर होणाऱ्या परिणामाबद्दल वाढवून-चढवून सांगितलं जातय. मंत्रालयाच म्हणणं आहे की, ई-0 कडे परतण्याचा ऑप्शन भारताला मागे ढकलेलं.

जुन्या वाहनाच्या स्क्रॅपिंगमधूनही रेयर अर्थ मेटल्स

गडकरी आपल्या संबोधनात म्हणाले की, भारत आधीपासून नवीन बॅटरी टॅक्नोलॉजीवर काम करत आहे. देशातील स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, जिंक आयन आणि एल्युमिनियम आयन बॅटरीवर रिसर्च करत आहेत. जुन्या वाहनाच्या स्क्रॅपिंगमधूनही रेयर अर्थ मेटल्स आणि दूसरे मेटल्स काढता येऊ शकतात.

सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होतो

काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण आता भारतात चीप निर्मिती सुरु झालीय. गडकरी यांच्यानुसार ही आत्मनिर्भरता भविष्यात इंधन आणि बॅटरी सेक्टरमध्ये सुद्धा पहायला मिळेल.

आंतरराष्ट्रीय बाजार खूप मोठा आहे

पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची मागणी सध्या कमी होणार नाहीय असं गडकरी या प्रसंगी म्हणाले. ऑटोमोबाइल प्रोडक्शनमध्ये दरवर्षी 15-20 टक्के वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार खूप मोठा आहे. म्हणजे सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाहनांची विक्री सुरु राहिलं. पण पर्यायी इंधन आणि टेक्नोलॉजी हळूहळू आपलं स्थान मजबूत बनवेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.