Maharashtra Rain: महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार! पुढील आठवडाभर १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
esakal September 12, 2025 10:45 PM

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. आज (शुक्रवार, ता. १२) सकाळपासूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबईतही पावसाची रिमझिम सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर १७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्ह्यात १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याच्या अंदाज वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Traffic: प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद, 'असे' असतील पर्यायी मार्ग; अत्यावश्यक वाहनांसाठी विशेष सोय

दरम्यान, आठवडाभर मुसळधार पाऊसपडणार असून हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

२० राज्यांना पावसाचा अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ राहत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. या दरम्यान, आता २० राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले आहे.

नेहमी पेट्रोल पंप का म्हणतात, डिझेल पंप का नाही? वाचा मनोरंजक उत्तर... मोरबे धरण फुल्ल

नवी मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या मोरबे धरणाने सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे शहराला दिलासा मिळाला आहे. या वर्षी, धरणाने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 88.16 मीटर (100.80 टक्के साठवणूक) ही त्याची निर्धारित पाणी पातळी गाठली. तथापि, 2024 मध्ये, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हाच टप्पा खूप आधी गाठला गेला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.