OBC Protest: मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा; दसऱ्यानंतर ओबीसी आंदोलक मुंबईत धडकणार?
Saam TV September 12, 2025 10:45 PM
  • मराठा आंदोलनानंतर ओबीसी समाज आक्रमक भूमिकेत.

  • दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसींचा भव्य मोर्चा अपेक्षित.

  • राज्यातील जातीय राजकारण आणखी तापण्याची शक्यता.

हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईत चक्काजाम केल्यानंतर आता मराठ्यांच्या मागण्यावर जीआर निघाला.. मात्र ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून आता या जीआरला विरोध केला जातोय. त्यात जीआरविरोधात ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरण्याच्या तयार आहे. मराठ्यांप्रमाणे आता ओबीसीही मुंबईत धडकणार आहेत. मुंबईतल्या मोर्चासाठी ओबीसी समाजाची रणनिती काय आहे पाहूयात.

दसऱ्यानंतर ओबीसीसंघटनांकडून 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चाचे आयोजन केलं जाणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून चार ते पाचजणांचा बैठकीत समावेश होणार. तर दुसरीकडे न्यायालयीन लढाईसाठी वकील संघटनांची 13 सप्टेंबरला बैठक होणारेय. तसचं मुंबई हायकोर्टाच्या चार खंडपीठात मराठा समाजाच्या जीआर विरोधात याचिका टाकली जाणार आहे.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

दरम्यान या जीआरमुळे अराजकता माजेल असं छगन भुजबळ म्हणतायत. तर दुसरीकडे मराठा समाजाच्या जीआरमुळे ओबीसीचं अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीय. एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर आता कळीचा मुद्दा बनत चालला आहे..त्यात ओबीसी समाजही रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. जरांगेंप्रमाणेच ओबीसीच्या आंदोलनाच्या भाषेमुळे सरकारची कोंडी होण्याची चिन्ह आहेत.आणि.ही कोंडी फोडण आगामी काळात सरकारची मोठी परीक्षा असेल.

OBC Reservation: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता, भुजबळ आणि मुंडे OBC साठी मंत्रिपद कधी सोडणार?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.